पाटणा : वसंत पंचमीच्या मुहूर्तावर देशभरात देवी सरस्वतीची पूजा केली जाते. देशभरात निरनिराळे कार्यक्रम आयोजित केले जातात. पण असा कार्यक्रम तुम्ही आत्तापर्यंत पाहिला नसेल.... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाटण्याच्या प्रसिद्ध बीएन महाविद्यालयातला एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच वायरल होताना दिसतोय. वसंत पंचमीच्या दिवशी सरस्वती पूजनाचा कार्यक्रम या महाविद्यालयातही आयोजित करण्यात आला होता. पूजेच्या नावानं इथं रात्रभर बारबाला थिरकत होत्या... आणि महाविद्यालयातील विद्यार्थी बारबालांसोबत ठुमकत होते. 


हा व्हिडिओ समोर आल्यानंतर लोक पाटण्यातील शिक्षण पद्धतीवर प्रश्न उपस्थित करत आहेत.


सरस्वती पूजनाच्या कार्यक्रमाची परवानगी घेण्यात आली होती. परंतु, पूजेच्या कार्यक्रमात बारबालांना आमंत्रित करण्यात आलं... मंचावर जोरदार अश्लील डान्स सादर झाले... हे प्रकरण सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आल्यानंतर कुलगुरू रासबिहारी सिंह यांनी चौकशीचे आदेश दिले.


या घटनेची पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आलीय. परंतु, मिळालेल्या माहितीनुसार, या कार्यक्रमात शहरातले अनेक प्रसिद्ध व्यक्ती उपस्थित होत्या... आणि पोलिसही बारबालांसोबत ठुमके लगावण्यात मागे नव्हते... 


ही घटना समोर आल्यानंतर कार्यक्रमाचे आयोजक फरार झाल्याचं सांगण्यात येतंय. जिल्हाधिकारी कुमार रवी यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिलेत.