हिम वादळानंतर भारतीय जवानांचं गस्त पथक बेपत्ता, जवानांचा शोध सुरु
भारतीय जवानांचं पथक बेपत्ता झाल्याने चिंता वाढली आहे. या जवानांचा शोध घेण्यासाठी टीम तैनात करण्यात आली आहे.
मुंबई : अरुणाचल प्रदेशात आलेल्या बर्फाच्या वादळात भारतीय लष्कराचे एक गस्त घालणारे पथक बेपत्ता झाल्याचे सांगण्यात येत आहे. हे युनिट 6 फेब्रुवारीपासून बेपत्ता आहे, ज्यामध्ये या क्षणी 7 सैनिक आहेत. ज्यांची अजून कोणतीही माहिती मिळालेली नाही.
जवानांचा शोध सुरू
जवानांच्या या पथकाशी कोणताही संपर्क होत नव्हता. त्यानंतर लगेचच त्वरित तज्ञांची टीम घटनास्थळी तैनात करण्यात आली. त्या टीममधील तज्ज्ञ त्या हरवलेल्या टीमचा शोध घेत आहेत.
एका अधिकाऱ्याने सांगितले की, तवांग आणि बोमडिला सारख्या उंच भागात दरवर्षी बर्फवृष्टी होते. यावेळी 34 वर्षांनंतर दारिया हिलमध्ये मोठी बर्फवृष्टी झाली आहे. शेवटची मोठी बर्फवृष्टी 1988 मध्ये झाली होती. रविवारी आलेल्या या वादळानंतर या जवानांशी संपर्क होऊ शकलेला नाही. ज्यांचा आता शोध सुरू आहे.