मुंबई : मुलांचा जन्म होण्याआधी पासूनच आई-वडिलांना त्यांच्या भविष्याची चिंता होत असते. जर तुम्ही तुमच्या मुलांची वाढ होण्याआधी तुमच्याकडे चांगला फंड तयार व्हवा असं वाटत असेल तर एलआयसी जीवन तरुण पॉलिसीमध्ये (LIC Jeevan Tarun Policy) आत्तापासूनच गुंतवणूक सुरु करु शकता. वीमा योजनेमध्ये LIC भारतात सर्वात जास्त लोकप्रिय कंपनी आहे. जर तुम्ही देखील यामध्ये गुंतवणूक केली तर तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी नक्कीच हा योग्य निर्णय ठरु शकतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'जीवन तरुण पॉलिसी' हा नॉन लिंक्ड लिमिटे़ड प्रीमियम प्लॅन आहे. मुलांचं भविष्य आणि शिक्षण यांचा विचार करुन या योजनेची निर्मिती केली आहे. यासोबतच, मुलांना सेविंग आणि विमा या दोन्ही कवरचा देखील फायदा मिळतो.


गुंतवणूकीचं वय


जर तुम्ही तुमच्या मुलांसाठी एलआयसीच्या जीवन तरुण पॉलिसी घेत असाल तर लक्षात असूद्या की तुमच्या मुलाचं किंवा मुलीचं वय हे 3 महिन्यापासून 12 वर्षांपर्यंत असेल तरच तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता.


पॉलिसीचे चार पर्याय


या पॉलिसीमध्ये तुम्ही सर्व्हायव्हल बेनिफिटचा पर्याय देखील निवडू शकता. जर विमाधारकाने पहिला पर्याय निवडला, तर त्याला कोणत्याही प्रकारचे जीवित लाभ मिळत नाही.


Maturity Periods काय आहे?


तुमचा मुलगा किंवा मुलगी 25 वर्षांचे झाल्यावर, टॅब एलआयसी जीवन तरुण पॉलिसी (LIC Jeevan Tarun Policy) मॅच्युअर होईल. तसेच, जर तुम्ही 10 वर्षांच्या मुलासाठी पॉलिसी घेतली असेल, तर ती 15 वर्षांनी मॅच्युअर होईल. या प्लॅनची ​​खास गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्या गरजेनुसार यामध्ये गुंतवणूक करू शकता. तुमचा मुलगा किंवा मुलगी 20 वर्षांचे होईपर्यंत तुम्हाला प्रीमियम भरावा लागेल. ज्यानंतर 5 वर्षांनी म्हणजेच मुलगा किंवा मुलगी 25 वर्षांचे झाल्यावर त्याला मॅच्युअरची रक्कम मिळेल.


जर तुम्ही रोज 150 रुपये गुंतवले तर तुम्हाला इतके लाख मिळतील.


जर तुमच्या मुलाचे वय 12 वर्षे असेल आणि तुम्ही त्यात गुंतवणूक केली तर पॉलिसीची मुदत किमान 5 लाख रुपयांच्या विमा रकमेसह 13 वर्षांसाठी असेल. जर तुम्ही दररोज 150 रुपये गुंतवले तर तुम्हाला वार्षिक 55 हजार रुपये होतील. या अर्थाने आठ वर्षांत तुमची एकूण गुंतवणूक 4 लाख 40 हजार 665 रुपये होईल. ज्यावर तुम्हाला 2 लाख 47 हजार रुपयांचा बोनस मिळेल. तसेच, विमा रक्कम 5 लाख रुपये असेल. याव्यतिरिक्त, तुम्हाला 97 हजार 500 रुपयांचा लॉयल्टी बेनिफिट मिळेल, जर तुमचा मुलगा किंवा मुलगी 25 वर्षांचे झाल्यावर 8 लाख 44 हजार 500 रुपयांचा लाभ देईल.