Paytm IPO : गुंतवणूकदारांना शेअर बाजारात दिवाळीपर्यंत मोठी कमाई करण्याची संधी मिळू शकते. देशातील मोठी डिजिटल पेमेंट कंपनी पेटीएम आपला आयपीओ आणण्याच्या तयारीत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सूत्रांच्या मते कंपनीला 22 हजार कोटींची रक्कम उभी करायची आहे. त्यासाठी कंपनी आयपीओ आणण्याच्या तयारीत आहे. देशातील आतापर्यंतचा हा सर्वात मोठा आयपीओ असू शकतो. त्याआधी 2010 मध्ये कोल इंडिया लिमिटेडचा आयपीओमधून 15 हजार 200 कोटींचा फंड उभा करण्यात आला होता. 


दिवाळीपर्यंत येईल आयपीओ


पीटीआयच्या रिपोर्टनुसार, पेटीएम या वर्षाच्या अखेरीस आयपीओ आणण्याच्या तयारीत आहे. सॉफ्टबँक आणि अलीबाबाची भागिदारी असलेली पेटीएम कंपनी आयपीओच्या माध्यमातून आपली व्हॅल्युएशन 25 अब्ज डॉलरच्या वर पोहचवू शकते. 


कंपनीची शुक्रवारी बैठक होणार आहे. ज्यामध्ये पेटीएमच्या आयपीओला औपचारीक पद्धतीने मंजूरी देण्यात येईल. पेटीएमने सध्या याबाबतीत काहीही सांगितलेले नाही. पेटीएमच्या गुंतवणूकदारांमध्ये बर्कशायर हाथवे आणि एंट ग्रुप देखील सहभागी आहे.