पेट्रोल भरल्यानंतर `ही` कंपनी देत आहे १००% कॅशबॅक!
नोटबंदीनंतर केंद्र सरकारने डिजिटल पेमेंटला खूप प्रोत्साहन दिले आहे.
नवी दिल्ली : नोटबंदीनंतर केंद्र सरकारने डिजिटल पेमेंटला खूप प्रोत्साहन दिले आहे. त्यानंतर ई-वॉलेट कंपन्यांनी लोकांना आकर्षित करण्यासाठी अनेक ऑफर्स सादर केल्या. पहिल्यांदा ट्रांसजेंक्शन करणाऱ्या युजर्सला या कंपन्या आकर्षक ऑफर्स देतात. Paytm ने देखील प्रथम डिजिटल वॉलेट वापरणाऱ्यांसाठी आकर्षक ऑफर दिली होती. यावेळी कंपनीने युजर्ससाठी धमाकेदार ऑफर सादर केली आहे. कार किंवा बाईक मध्ये पेट्रोल भरल्यानंतर Paytm युजर्सना १००% कॅशबॅक देण्याची ऑफर देण्यात येणार आहे.
Paytm ने दिलेल्या माहितीनुसार राजस्थानची राजधानी जयपूर येथे ३१ ऑक्टोबरला पेट्रोल किंवा डिझेल घेतल्यानंतर १००% कॅशबॅक मिळणार आहे. म्हणजेच तुम्हाला पेट्रोल पूर्णपणे मोफत मिळेल. ही ऑफर जयपूरच्या सर्व पेट्रोल पंपावर लागू आहे. यासाठी कंपनीतर्फे काही नियम व अटी लागू करण्यात आल्या आहेत. पेटीएमच्या या ऑफरचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला पेट्रोल संध्याकाळी ६ ते रात्री ९ वाजेपर्यंत भरावे लागेल.
पेट्रोलचे पेमेंट करण्यासाठी तुम्हाला संबंधित पेट्रोल पंपावर असलेला QR कोड स्कॅन करावा लागेल. कॅशबॅकची अधिकाधिक किंमत १०० रुपये असेल. म्हणजेच जर तुम्ही १०० रुपयांचे पेट्रोल किंवा डिझेल भरले तर कंपनीतर्फे तुम्हाला १००% कॅशबॅक मिळेल. त्यापेक्षा अधिक किंमतीचे पेट्रोल भरले तर १०० रुपयांचे कॅशबॅक कंपनीतर्फे मिळेल. त्याचबरोबर या सुविधेचा वापर तुम्ही फक्त एकदाच करू शकता. कॅशबॅक ताबडतोब होईल किंवा पैसे वॉलेटमध्ये जमा होण्यासाठी ४८ तासांचा कालावधी लागू शकतो.