Paytm Shares: ऑनलाइन पेमेंट सर्व्हिस देणारी पेटीएमवर कारवाईचा बडगा उचलल्यानंतर कंपनीच्या संकटात वाढ झाली आहे. पेटीएमच्या बँकिग सेवांवर आरबीआयने बंदी घातल्यानंतर त्याचा परिणाम शेअरवरही होताना दिसत आहे. शेअर बाजार उघडताच कोसळला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पेटीएमवर आरबीआयने कारवाई केल्यानंतर गुरुवारी म्हणजेच बजेटच्या दिवशीच पॅरेंट कंपनी one97 communication च्या शेअरवरती थेट परिणाम झाल्याचे दिसत आहे. स्टॉक मार्केट सुरू होताच पेटीएमचे शेअर कोसळले आहेत. गुरुवारी कंपनीचे शेअर्स 20 टक्के घसरणीसह लोअर सर्किटला धडकले आहेत. पेटीएम शेअर्सची पडझड इतक्यात थांबणार नाही, असी शक्यता अर्थतज्ज्ञ वर्तवत आहेत. पेटीएमचा शेअर 609 रुपयांवर येऊन थांबला आहे. शेअरमध्ये झालेल्या पडझडीनंतर कंपनीचे मार्केट कॅपिटलायजेशन (Paytm Mcap) मध्ये घसरण होऊन 38670 कोटींवर पोहोचला आहे. 


गुरुवारी 20 टक्क्यांपर्यंत शेअर्स कोसळल्यानंतर आज शुक्रवारीही शेअर्समध्ये मोठी पडझड झाली आहे. शेअर बाजार सुरू होताच पेटीएमचे शेअर्स 20 टक्क्याने कोसळले त्याचबरोबर शेअरची किंमत 121 रुपयांनी कमी होऊन थेट 487.20 रुपये झाली आहे. त्याच बोरबर कंपनीचे मार्केट कॅपिटलायजेशन कमी होऊन 30940 रुपये आहे. 


दरम्यान, पेटीएम पेमेंट्सवर बँकेने आरबीआयवर कारवाई केल्यानंतर पॅरेंट कंपनीने वन 97 कम्युनिकेशन आता दुसरे पर्याय शोधत आहेत. कंपनीने याबाबत एक स्टेटमेंटही जारी केले आहे. कंपनीने म्हटलं आहे की, पेटीएम पेमेंट्स बँक आरबीआयच्या निर्देशांचे पालन करुन वेगाने काम करत आहेत. पेमेंट कंपनी असल्याकारणाने ओसीएल फक्त पेटीएम पेमेंट बँकच नाही तर इतर बँकांसोबतही काम करत आहे. या प्रक्रियेला अधिक गती देत आहोत. त्यामुळं भविष्यात पेटीएम पेमेंट्स बँकच नाही तर इतर बँकांसोबतही काम करण्याची शक्यता आहे. 



रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या कारवाईनंतर आणि शेअरच्या झालेल्या पडझडीनंतर पेटीएमचे फाउंडर आणि सीईओ विजय शेअर शर्मा यांनी ट्विटर अकाउंटच्या माध्यमातून युजर्सना विश्वास देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहलं आहे की, पेटीएम युजर्सना मी सांगू शकतो की, तुमचं आवडतं अॅप सुरू आहे. 29 फेब्रुवारीनंतरही नेहमीप्रमाणेच अॅप काम करत आहेत. मी पेटीएमच्या टीमच्या प्रत्येक सदस्यांसोबत तुम्ही दिलेल्या समर्थनाला सलाम करतोय, असं त्यांनी म्हटलं आहे. 


पेटीएम पेमेंट बँक म्हणजे काय


पेटीएमची बँकिग शाखा म्हणजे पेटीएम पेमेंट्स बँकबद्दल जाणून घ्या. पेटीएम पेमेंट बँकेचे युजर्स फक्त पैसे डिपॉजिट करु शकतात. बँकेकडे लोनवगैरे देण्याचा अधिकार नसतो. तसंच, बँक कोणालाही डेबिट कार्ड जारी करु शकते मात्र क्रेडिट कार्ड घेता येऊ शकत नाही. हे विशेषतः व्यापाऱ्यांवर केंद्रित होते, ज्यामध्ये त्यांना मिळणारे पेमेंट त्यांच्या पेटीएम पेमेंट खात्यात पोहोचते आणि नंतर ते इतर बँक खात्यांमध्ये हस्तांतरित केले जाते. One97 Communications आणि या कंपनीकडे प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट (PPI लायसन्स) आहे, हा परवाना 2017 मध्ये प्राप्त झाला होता.