गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या कारवाईनंतर पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया  (PFI) आणि त्याच्याशी संबंधित इतर अनेक संघटनांवर केंद्र सरकारने (Central Government) 28 सप्टेंबर रोजी बंदी घातली आहे. या निर्णयानंतर देशभरात राजकारण सुरु झालंय.  सरकारच्या या कारवाईविरोधात काही लोकांनी आवाज उठवला आहे. तर अनेकांनी याचे समर्थन केलंय.  या मुद्द्यावरुन वृत्तवाहिन्यांमध्ये वादविवादही झाले. सुप्रीम कोर्टाचे (supreme court) वकील अश्विनी उपाध्याय (Ashwini Upadhyay) यांनीही एका कार्यक्रमात बोलताना पीएफआयवर (PFI) जोरदार निशाणा साधला, तसेच काँग्रेस पक्षावर जोरदार हल्ला चढवला. यावेळी उपाध्याय म्हणाले की, देशात शांतता संविधानामुळे (Constitution) नाही तर हिंदूंमुळे (Hindu) आहे. ( supreme court  Ashwini Upadhyay said Peace in the Country is Due to Hindu not Constitution)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेटवर्क 18 इंडियावरील चर्चेत सर्वोच्च न्यायालयाचे वकील अश्विनी उपाध्याय (Ashwini Upadhyay) यांनी भाग घेतला होता. यावेळी बोलताना त्यांनी हे विधान केले आहे.  "काय कारण आहे की आजच पीएफआयवर बंदी घालण्यात आली आणि आजच काँग्रेसने (Congress) दिग्विजय सिंह (digvijay singh) यांचे नाव काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणुकीसाठी घोषित केले. कदाचित उद्या ते काँग्रेसचे अध्यक्ष होतील.  हे तेच दिग्विजय सिंह आहेत जे पीएफआयसोबत (PFI) स्टेज असतात. ते या संघटनेचे सर्वात मोठे समर्थक आहेत. हे तेच दिग्विजय सिंह आहेत जे बाटला हाऊसला (batla house) थ्रो-इन एन्काउंटर असल्याचे सांगतात. मुंबई हल्ल्या (26/11 attack) खोटा असल्याचे म्हणतात."


“मी फक्त हे समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे की पीएफआय (PFI) संपली आहे, पण त्यांचा सर्वात मोठा समर्थक काँग्रेसचा (Congress) अध्यक्ष होणार आहे. यामध्ये काय संबंध आहे ?, असा सवाल अश्विनी उपाध्याय यांनी केला.


"या देशात सुख-शांती संविधानामुळे नाही. या देशात धर्मनिरपेक्षता संविधानामुळे नाही. भारतातील धर्मनिरपेक्षता हिंदूंमुळेच आहे. जे आधी 90 टक्के होत ते आता 78 टक्क्यांवर आले आहेत," असेही अश्विनी उपाध्याय म्हणाले.


अश्विनी उपाध्याय पुढे म्हणाले की, "जिथे हिंदू संपले तिथे धर्मनिरपेक्षता चालत नाही. काश्मीर, लडाख आणि लक्षद्वीपमध्ये धर्मनिरपेक्षता चालत नाही. ज्या नऊ राज्यांत हिंदूंचा मृत्यू झाला तिथे धर्मनिरपेक्षता चालत नाही. या देशात जो बंधुभाव टिकून आहे तो हिंदूंमुळेच."


पीएफआयवरील बंदीचे समर्थन करत उपाध्याय यांनी जोरदार हल्ला चढवला. "पीएफआय दहशत पसरवते, लव्ह जिहाद करते, धर्मांतर करते. परदेशी निधी घेतो. मदरसा चालवते. इस्लामला न मानणारे काफिर असल्याचे सांगितले जाते, काफिरांना मारा, त्यांचे धर्मांतर करा अशी पुस्तके छापते," असे अश्विनी उपाध्याय म्हणाले.