ये दिल मांगे `मोर`! पठ्ठ्यानं चमचांपासून साकारली अत्यंत सुंदर कलाकृती...; पाहा भन्नाट Video
Peacock Art by Spoon: चमच्यांचा उपयोग हा फक्त खाण्यासाठीच होतो असा नाही तर तो विविध वस्तू बनवण्यासाठीही केला जातो. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे ज्यात एका कलाकारानं चक्क चमच्यांपासून सुंदर असा मोराचा पिसारा बनवलेला आहे.
Peacock Art by Spoon: आपल्या प्रत्येकात एक ना एक कलाकार तरी असतोच. आपल्याला नानाविध गोष्टी घेऊन त्यातून काहीतरी हटके गोष्टी बनवायला या आवडतातच. परंतु तुम्ही कधी चमच्यांपासून बनवलेला मोर कधी पाहिला आहे का? अशाच एक इसमानं चक्क आपल्या घरातील चमच्यांपासून सुंदर असा मोराचा पिसारा तयार केलेला आहे. तुम्हाला हे जाणून घेऊन आश्चर्य वाटले परंतु हे खरं आहे. काटेरी चमचे घेेऊन अशाच एका बुद्धीमान व्यक्तीनं आपली शक्कल लढत सुंदर असा मोराचा पिसारा तयार केलेला आहे. त्यामुळे त्याच्या या क्रिएटिव्हीचे कौतुक करावे तेवढेच कमी आहे. सध्या कृत्रिम बुद्धीमत्ता येऊ घातली आहे तेव्हा आपल्या सर्वांच्याच मनात अशीच एक भिती आहे की लवकरच ही बुद्धीमत्ता मानवाला आव्हान देणार आहे. परंतु ही अशी कलाकृती तर AI ला पण कदाचित जमणार नाही. तेव्हा चला तर मग पाहुया की नक्की या कलाकृतीत असं आहे तरी काय? तुम्हीही या कलाकृतीच्या प्रेमात पडल्याशिवाय राहणार नाही.
माती, वाळू, दगड, विटा, स्टील, लाकूड अशा नानाविध गोष्टींपासून विविध गोष्टी, वस्तू बनवतो. यातून माणसांची, प्राण्यांची, वस्तूंची रूप साकार करणं ही पण एक अनोखी शैली आहे. त्यामुळे यातून साध्य झालेला कलाविष्कार हा आपल्या सगळ्यांनाच आश्चर्यचकित करून जातो. तेव्हा सध्या व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये दिसणारा मोराचा पिसारा या कलाकारानं कसा साकार हे आपण जाणून घेऊया.
@massimo या ट्विटर अकांऊटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आलेला आहे. यात तुम्ही पाहू शकता की एका कलाकारनं चक्क वेगवेगळे चमचे घेऊन त्यातून सुंदर असा मोर तयार केला आहे. त्यानं विविध प्रकारचे चमचे घेतले आणि ते कट करून त्यानं त्याचा सुंदर असा मोर आणि मोराचा पिसारा तयार केलेला आहे. या कलाकाराचे नावं हे मिशेल टी असं आहे. त्यानं यापुर्वीही अशा हटके कलाकृती बनवल्या आहेत. त्यामुळे त्याची चांगलीच चर्चा रंगलेली असते. आता त्याच्या या नव्या कलाकृतीनं चाहत्यांचे लक्ष हे वेधून घेतलेले आहे. यावेळी त्यानं फोटोच्या खाली कॅप्शनमध्ये लिहिलंय की, 'हा चमचे आणि काट्यांपासून बनवलेला मोर आहे'
सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे. आतापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे आणि त्याखाली अनेकांनी कमेंट्स केलेल्या आहेत. त्यामुळे या व्हिडीओची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. तुम्हीही असा जुगाड घरच्या घरी कराल?