नवी दिल्ली:  जर तुम्ही किंवा तुमचे पालक कर्मचारी पेन्शन योजनेअंतर्गत कर्मचारी असाल तर तुमच्यासाठी कामाची बातमी आहे. जर पालकांपैकी एक किंवा दोघेही पगारदार पालक असतील आणि कर्मचारी पेन्शन योजनेचे सदस्य असतील, तर त्यांच्या मुलांना आर्थिक मदत (Financial Support) दिली जाते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

EPFO Pension Scheme म्हणजेच EPS मध्ये पैसे जमा करण्यासाठी, कंपनी आपल्या कर्मचार्‍यांच्या पगारातून पैसे कापत नाही, तर कंपनीच्या योगदानाचा काही भाग EPS मध्ये जमा करते. अशा परिस्थितीत कुटुंबातील कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला की त्याच्या अनाथ मुलांना पेन्शन मिळते. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) कडून EPS योजनेंतर्गत अनाथ मुलांना मिळणाऱ्या मदतीविषयी जाणून घेऊ या (EPS लाभ) ...


EPS अंतर्गत मुलांसाठी फायदे
याअंतर्गत अनाथ मुलांना मिळणारे निवृत्ती वेतन मासिक विधवा निवृत्ती वेतनाच्या ७५ टक्के असेल.
यामध्ये मिळणारी रक्कम दरमहा किमान 750 रुपये असेल.
जर दोन मुले असतील तर प्रत्येक दोन अनाथ मुलांना दरमहा 750 रुपये पेन्शन दिली जाईल.
EPS अंतर्गत, अनाथ मुलांना वयाच्या 25 व्या वर्षापर्यंत ही पेन्शन मिळेल.
या अंतर्गत अपंग मुलाला आयुष्यभर पेन्शन दिली जाईल.


पेन्शन कुठून येते?


  • EPS साठी, कंपनी आपल्या कर्मचार्‍यांच्या पगारातून एकही पैसा कापत नाही.

  • कंपनीच्या योगदानाचा काही भाग ईपीएसमध्ये टाकला जातो.

  • नवीन नियमानुसार 15,000 रुपयांपर्यंत मूळ वेतन असलेल्यांना ही सुविधा मिळणार आहे.

  • तुमच्या पगाराच्या एकूण 8.33 टक्के रक्कम ईपीएसमध्ये जमा केली जाते.

  • यानुसार, 15,000 रुपये मूळ वेतन मिळाल्यावर कंपनी EPS मध्ये 1,250 रुपये जमा करते.


Pension Rule, Pension Rule Orphan, EPFO, Pension, EPS Orphan,