Pension Scheme: देशभरातील पेन्शनधारकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. पेन्शनधारकांना सरकार अनोखे गिफ्ट देण्याच्या तयारीत आहे. आता PFRDA कडून सर्व बँक शाखांमध्ये NPS सुविधा उपलब्ध करून देण्याची योजना आखली जात आहे. यामुळे प्रत्येक पेन्शनधारकाला त्याच्या पेन्शनचा लाभ सहज मिळू शकेल. पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी (PFRDA) चे अध्यक्ष दीपक मोहंती यांनी याबद्दल माहिती दिली. नक्की कशी असेल ही योजना? सर्वसामान्य पेन्शनधारकांना याचा कसा लाभ मिळेल? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

NPS पेन्शन लोकांना सहज उपलब्ध व्हावी यासाठी सर्व बँक शाखा आणि पोस्ट ऑफिसमध्ये उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जात असल्याची माहिती दीपक मेहता यांनी दिली. प्राधिकरणाने नवीन पेन्शन प्रणाली (NPS) च्या वितरणासाठी प्रादेशिक ग्रामीण बँका आणि बँक प्रतिनिधींना जोडून घेतले आहे. यामुळे खेड्यापाड्यातील आणि लहान शहरांमधील लोकांपर्यंतही या पेन्शन योजनेचा लाभ पोहोचणार आहे. PFRDA ने NPS च्या विक्रीसाठी जवळपास सर्व बँकांना जोडले आहे. असे असले तरी ही सुविधा बँकांच्या सर्व शाखांमध्ये उपलब्ध नाही. पेन्शन उत्पादन एनपीएस लोकांना सहज उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. सर्व बँक शाखा आणि पोस्ट ऑफिसमध्ये पेन्शन उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरु आहे. आम्ही या विषयावर उच्च व्यवस्थापन स्तरावर देखील चर्चा केली आहे पण शेवटी निर्णय बँकांनाच घ्यावा लागेल, असे मोहंती यांनी सांगितले.


तुम्ही RRB कडून NPS चे फायदे 


आम्ही NPS 'मॉडेल' अंतर्गत खेडे आणि लहान शहरांमधील सर्व लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रादेशिक ग्रामीण बँकांचा (RRBs) समावेश केला आहे. त्यामुळे आता RRB कडून देखील NPS घेता येईल. याशिवाय बँक प्रतिनिधी (बँकिंग करस्पाँडंट) मार्फत एनपीएस घेण्याची परवानगीही देण्यात आली आहे.


13 लाख भागधारक जोडण्याचे लक्ष्य


गेल्या आर्थिक वर्षात आम्ही 10 लाख भागधारक जोडले होते. चालू आर्थिक वर्षात खाजगी क्षेत्रातून NPS अंतर्गत एकूण 13 लाख भागधारक जोडण्याचे लक्ष्य आहे.


अधिकृत डेटावरून प्राप्त माहिती


अधिकृत आकडेवारीनुसार, 16 सप्टेंबर 2023 पर्यंत NPS शी जोडलेल्या लोकांची एकूण संख्या 1.36 कोटी होती (NPS Lite वगळता). अटल पेन्शन योजनेतील ग्राहकांची संख्या पाच कोटी आहे.


PFRDA APY आणि NPS चे व्यवस्थापन 


PFRDA हे NPS आणि अटल पेन्शन योजनेचे व्यवस्थापन करते. अटल पेन्शन योजनेत योगदानाच्या रकमेच्या आधारावर पेन्शन निश्चित केली जाते. तर NPS मध्ये, वयाची 60 वर्षे पूर्ण केल्यानंतर, एकूण कॉर्पसच्या किमान 40 टक्के पेन्शन उत्पादने खरेदी करणे अनिवार्य असते.


अनेक देशांमध्ये जीडीपीच्या 100 टक्क्यांहून अधिक


NPS मध्ये निवृत्तीवेतनाची रक्कम निश्चित न करण्यासंबंधीच्या प्रश्नावर मोहंती यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पेन्शन दीर्घकाळ निश्चित करणे व्यावहारिक नाही. काही विकसित देशांमध्ये जेथे पेन्शन फंड हा सकल देशांतर्गत उत्पादनाच्या (जीडीपी) 100 टक्के किंवा त्याहून अधिक आहे, तेथेही याबाबत समस्या आहे. भारतात, EPFO ​​च्या पेन्शन उत्पादनांसह सर्व प्रकारच्या पेन्शन संबंधित मालमत्ता, जीवन विमा इ. जीडीपीच्या 16.5 टक्के आहेत. तर NPS आणि अटल पेन्शन योजनेतील निधी GDP च्या 3.6 टक्के आहे.


पीएफआरडीएच्या अध्यक्षांची माहिती


NPS वरील परतावा खूप चांगला आहे. लोक दीर्घकाळात चांगल्या निधीची अपेक्षा करू शकतात. पेन्शन योजनांच्या अंतर्गत इक्विटीमध्ये केलेल्या गुंतवणुकीने सुरुवातीपासून 12.84 टक्के परतावा दिला आहे. सरकारी कर्मचार्‍यांच्या बाबतीत, NPS मधून परतावा 9.4 टक्क्यांपर्यंत आहे, असे PFRDA ने सांगितले.


NPS मध्ये कमिशन कमी 


एनपीएस विक्रीसाठी कमी कमिशन मिळते. यामुळे, एजंट किंवा पीओपी (पॉइंट ऑफ प्रेझेन्स) म्हणजेच बँका एनपीएस उत्पादन विकण्यासाठी अधिक आकर्षित होणार नाहीत. असे असताना ग्राहकांना फायदा व्हावा म्हणून ते किमान किमतीचे उत्पादन ठेवणे हे आमचे उद्दिष्ट असल्याचे मोहंती म्हणाले. 


आता तुम्हाला किती कमिशन मिळेल?


सध्या, बँका आणि इतर पीओपींना खासगी क्षेत्रात NPS खाते उघडल्यावर योगदानाच्या अर्धा टक्के कमिशन मिळते. यामध्ये कमिशनची किमान मर्यादा ३० रुपये आणि कमाल २५ हजार रुपये आहे. त्याच वेळी, इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे (नागरिकांसाठी आणि दोन स्तरावरील खात्यांसाठी) NPS खाते उघडण्यावर कमिशन 0.20 टक्के आहे. यामध्ये किमान मर्यादा 15 रुपये आणि कमाल 10,000 रुपये आहे.