मुंबई : आताच्या महागाईमध्ये प्रत्येक जण पैसा कसा मिळवता येईल, यासाठी प्रयत्न करत असतो. अशा वेळी असं वाटतं की पैशांचा पाऊस पडला तर, असं फक्त स्वप्नात होवू शकतं. तलावात नोटांचा पाऊस तुम्ही कधी ऐकलं नसेल. पण एका तलावत पैशांचा पाऊस झाला आहे. नागरिकांना तलावात 200 आणि 500 रूपयांच्या नोटा तरंगताना दिसल्या. तलावात नोटा तरंगत आहेत, ही माहिती आसपासच्या लोकांना कळाली आणि त्यांनी तलावाकडे धाव घेतली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इतकचं नाही तर लोकांनी तलावात उड्या मारून नोटा जमा करण्यास सुरूवात केली. स्थानिक प्रशासनाला घटनेची माहिती मिळताचं ते घटनास्थळी पोहोचले. महापालिकेचे कर्मचारी बोट घेऊन तलावात उतरले आणि नोटा जमा करू लागले. पण तलावात 200 आणि 500च्या नोटा नक्की आल्या कशा याचा तपास सध्या सुरू आहे. 


नोटा जमा करण्यासाठी लोकांनी एकचं गर्दी केली. पण पोलिसांनी लोकांना तिथून हटवले. पोलिसांना हा प्रकार स्थानिक मोहम्मद उस्मान यांनी सांगितला. ते म्हणाले, 'मला रविवारी काही नोटा तलावात तरंगताना दिसल्या. त्यानंतर काही लोकांनी पाण्यात उड्या मारून नोटा जमा केल्या. मला स्वतःला 2500 रूपये मिळाले.'


पोलिसांच्या अंदाजानुसार एखाद्या व्यक्तीचा पाकीट तलावात पडलं असावं. पण काही लोकांनी सांगितलं तलावात नोटांनी भरलेल्या बॅगा फेकल्या आहेत. त्यामुळे हा नक्की प्रकार काय आहे. याचा तपास पोलीस लावत आहेत. नोटांनी भरलेलं तलाव राजस्थानच्या अजमेरयेथे आहे. त्या तलावाचं नाव आनासागर असं आहे.