Navratri 2024: पितृपक्ष संपताच नवरात्रीचा उत्सव सुरु होत आहे. नवरात्रीदरम्यान ठिकठिकाणी मंजप सजवले जातात. तरुणाईदेखील मंडपात जाऊन गरबा खेळण्यासाठी सज्ज असते. यादरम्यान मध्य प्रदेशच्या इंदोरमधून एक बातमी समोर आली आहे. येथे जिल्हाध्यक्षांनी गरब्याचं आयोजन करणाऱ्या आयोजकांना एक सल्ला दिला आहे. जिल्हाध्यक्ष चिंटू वर्मा यांनी, गरब्यासाठी मंडपात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला गोमूत्र पाजलं पाहिजे असं ते म्हणाले आहेत. त्यांचं म्हणणं आहे की, हिंदूंचा गोमूत्र पिण्यात कोणताही आक्षेप नाही. इतकंच नाही तर टीळा न लावता आलेल्यांनाही गरबा मंडपता प्रवेश दिला जाऊ नये असंही ते म्हणाले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चिंटू वर्मा यांचं हे विधान सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. त्यांनी सोमवारी सांगितलं की, गरबा मंडपात अनेक प्रकारचे लोक येत असतात. गर्दीमध्ये प्रत्येकाची ओळख पटवता येत नाही. यामुळे जे कोणी गरबा खेळण्यासाठी मंडपात येईल त्याला प्रवेश देण्याआधी गोमूत्र पाजलं पाहिजे. ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड पाहण्यासंबंधी विचारलं असता ते म्हणाले, आजकाल कोणीही बनावट आधार कार्ड बनवू शकतं. अशा स्थिती गैर हिंदूदेखील हिंदू मंडपात प्रवेश करतात. 


चिंटू वर्मा यांनी पुढे सांगितलं की, गरबा मातेचा उत्सव आहे. अशा स्थितीत मंडपात येणाऱ्या सर्वांनाच गोमूत्र पाजायला हवं. ते म्हणाले की, वेळोवेळी अशा चर्चा होत असतात की गर्दीतून काही लोक गोंधळ घालण्याच्या उद्धेशाने सहभागी होतात. त्यामुळे आपण पूर्वकाळजी घेणं गरजेचं आहे. 


कधी आहे शारदीय नवरात्र?


यावेळी शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी 3 ऑक्टोबर रोजी सकाळी 12.19 वाजेपासून दुसऱ्या दिवशी म्हणजेच 4 ऑक्टोबर रोजी दुपारी 2:58 वाजेपर्यंत असणार आहे. अशा परिस्थितीत उदयतिथी नुसार 3 ऑक्टोबर 2024 रोजी शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे. तर 12 ऑक्टोबर 2024 पर्यंत नवरात्री असणार आहे.


दसरा मुहूर्त कधी आहे?


शनिवार, 12 ऑक्टोबर 2024 रोजी विजयादशमी म्हणजेच 'दसरा' आहे. या दिवशी विजय मुहूर्त दुपारी 02 वाजून 22 मिनिटांपासून ते 03 वाजून 09 मिनिटांपर्यंत आहे. हा दिवस वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून साजरा केला जातो.