बेक्कार.... मॅगी मिल्कशेक चाखणं दूर, पाहूनच पळाली नेटकऱ्यांची भूक
तुम्ही कधी मॅगी मिल्कशेक हा पदार्थ ऐकलाय का?
मुंबई : दोन मिनिटांत होणारी आणि क्षणातच पोट भरणारी मॅगी म्हणजे ट्रेकला जाणाऱ्यांपासून बालमित्रांपर्यंत सर्वांच्याच आवडीचा पदार्थ. संपूर्ण जगभरात मॅगीवर जीवापाड प्रेम करणारी मंडळी आहेत.
मॅगीचं रुप एक असलं तरीही तिच्यापासून बहुविध पदार्थ तयार करण्याला अनेकांचीच पसंती असते. मॅगी पकोडा, मॅगी पराठा, एग मॅगी वगैरे वगैरे... पण तुम्ही कधी मॅगी मिल्कशेक हा पदार्थ ऐकलाय का?
ऐकूनच कसंतरी झालं ना? इथं प्रत्यक्षात मॅगी मिल्कशेक नावाची विचित्र डिश अस्तित्वात असून, ती कमालीची व्हायरलही होत आहे. मॅगीचं हे रुप किंवा हा असा पदार्थ कुणालाही अपेक्षित नव्हता. पण, आता थेट या पदार्थाचा फोटोच व्हायरल होत आहे. जो पाहून नेटकऱ्यांनी चित्रविचित्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.
मिल्कशेकची चव ठाऊक नाही, पण या फोटोनंच अनेकांचे डोळे फिरले. हे शक्य तरी कसं आहे, असा प्रश्नच काहींना पडला. तर फोटो पाहूनच अनेकजण निशब्द झाले. या फोटोमध्ये मिल्कशेकनं भरलेला एक ग्लास दिसत असून, त्यावर मूठभर मॅगी टाकलेली दिसत आहे. आता मिल्कशेक आणि मॅगीचा तसा दूरदूरपर्यंत संबंध नाही. पण, इथं मात्र कोणा एका मास्टरशेफनं थेट मॅगी मिल्कशेकच तयार केला आहे. ज्यामुळं आता भल्याभल्यांची भूकही पळाली आहे, असं म्हणायला हरकत नाही.