Guru Purnima | आयुष्यात श्रीमंत व्हायचे असेल तर; चाणक्य यांनी सांगितलेल्या 5 गोष्टी लक्षात ठेवा
चाणक्य यांनी उत्पन्न, खर्च, भोग आणि गुंतवणूकीसंदर्भात भाष्य केले आहे. त्यानुसार व्यक्ती नक्कीच श्रीमंतीच्या पायऱ्या चढू शकतो.
मुंबई : आषाढ महिन्यातील शुक्लपक्ष म्हणजेच गुरू पौर्णिमा होय. या दिवशी गुरूचे पूजन केले जाते. शिक्षकच व्यक्तीच्या जिवनाची दिशा निश्चित करण्यात मोलाची कामगिरी बजावतात. भारतीय प्राचिन इतिहासातील असेच एक गुरू म्हणजेच चाणक्य होय. त्यांचे अनेक विषयांमधील पाठ आजही दिशादर्शक ठरतात. चाणक्य यांनी उत्पन्न, खर्च, भोग आणि गुंतवणूकीसंदर्भात भाष्य केले आहे. त्यानुसार व्यक्ती नक्कीच श्रीमंतीच्या पायऱ्या चढू शकतो.
चाणक्य यांनी धन कमावणे, बचत करणे, गुंतवणूकीचे गुरूमंत्र दिले आहेत. त्यांच्या चाणक्यनितीनुसार धन ईमानदारीने कमवायला हवे, बचतीपासून गुंतवणूकीपर्यंत काही गोष्टींकडे लक्ष द्यायला हवे.
चाणक्य म्हणतात...
- व्यक्तीने अशा ठिकाणी वास्तव्य करायला हवे ज्या ठिकाणी त्याला पुरेसा रोजगार प्राप्त होईल. अशा व्यक्तीला कधीही पैशाची चणचण भासत नाही.
- जो व्यक्ती पैशाला पाण्यासारखा वाया घालवतो किंवा खर्च करतो. आपल्या वाईट प्रसंगासाठी वाचवून ठेवत नाही. तो मुर्ख असतो. अशा व्यक्तीला कठीण समयी अडचणींचा सामना करावा लागतो. जी व्यक्ती कठीण प्रसंगांसाठी पैशाची बचत करते. ती व्यक्ती बुद्धीमान असते.
- पैसे कमावताना सर्वात महत्वाचे म्हणजेच तुमचे आर्थिक समृद्धीचे लक्ष (Financaial Goal)! एखादे लक्ष समोर असल्याशिवाय व्यक्ती पैसे कमाऊ शकत नाही. लक्ष पैसे कमावण्याला प्रेरित करते.
- तुम्ही जेवढी कमाई करता. ती पूर्ण बचत करणे मुर्खपणा असतो. पैसे वाचवण्याची सर्वोत्तम पद्धत म्हणजे त्याचा जास्तीत जास्त भाग गुंतवणे होय.
-व्यक्ती धन कमावत असेल तर त्याचा सदुपयोग करायला हवा. गरजेपेक्षा जास्त धन बचत करणेसुद्धा योग्य नाही. त्यासाठी धनाचे दान करायला हवे. विधायक कामांमध्ये नेहमी गुंतवणूक करायला हवी.