मुंबई: तुमची पेन्शन येत असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. नोव्हेंबर महिना संपण्यापूर्वी तुम्ही 3 कामं पूर्ण करणे गरजेचे असेल. जर तुम्ही हे केले नाही तर तुमचे पेन्शनही थांबू शकते. पेन्शनधारकांना 30 नोव्हेंबरपर्यंत त्यांचे लाइफ सर्टिफिकेट सादर करावे लागेल. याशिवाय अशी 2 कामं आहेत, जी तुम्हाला 30 नोव्हेंबरपूर्वी पूर्ण करायची आहेत. महिन्याच्या शेवटी तुम्हाला कोणती कामे आधी पूर्ण करायची आहेत ते पाहूयात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे काम 30 नोव्हेंबरपूर्वी पूर्ण करा
जर तुमची पेन्शन येत असेल तर तुम्हाला 30 नोव्हेंबरपूर्वी तुमचे लाइफ सर्टिफिकेट सादर करावे लागेल. तसे न केल्यास तुमची पेन्शन थांबू शकते. याशिवाय, जर तुम्ही गृहकर्ज घेण्याचा विचार करत असाल, तर एलआयसी हाऊसिंग फायनान्सचे विशेष गृह कर्ज या महिन्यात संपत आहे. त्या बाबत विचार करू शकता.


लाइफ सर्टिफिकेट सादर करा
पेन्शनधारकांना त्यांचे निवृत्ती वेतन मिळणे सुरू ठेवण्यासाठी दरवर्षी 30 नोव्हेंबरपर्यंत त्यांचे लाइफ सर्टिफिकेट सादर करावे लागते. हे लाइफ सर्टिफिकेट पेन्शनधारक जिवंत असल्याचा पुरावा आहे. जर तुम्ही लाइफ सर्टिफिकेट सादर केले नाही तर तुमचे पेन्शन थांबू शकते.


एलआयसी हाऊसिंग फायनान्समध्ये गृहकर्जासाठी अर्ज करा
LIC हाऊसिंग फायनान्सने 2 कोटी रुपयांपर्यंतच्या गृहकर्जासाठी गृहकर्जाचा दर 6.66 टक्क्यांवर आणला आहे. कृपया लक्षात घ्या की ही ऑफर फक्त 30 नोव्हेंबरपर्यंत वैध आहे आणि केवळ गृहकर्जांवर लागू होईल. यानंतर कंपनी व्याजदरात वाढ करू शकते.


जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेशासाठी नोंदणी
जवान नवोदय विद्यालयाच्या इयत्ता 9 वीच्या प्रवेशासाठी 30 एप्रिल 2022 रोजी होणाऱ्या निवड चाचणीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर आहे. या तारखेपर्यंत, तुम्ही नवोदय विद्यालय समितीच्या अधिकृत वेबसाइट, navodaya.gov.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकता.