Personal Loan Advantages And Disadvantages: आपल्या गरजा भागवण्यासाठी किंवा अडचणीच्या काळात आपण पर्सनल लोन घेतो. आपला सिबिल स्कोअर चांगला असेल तर पर्सनल लोन लगेच मिळतं. सर्वच बँका पर्सनल लोन (Personal Loan) देतात. पर्सनल लोन घेण्यासाठी कोणत्याही प्रकारचं तारण ठेवण्याची आवश्यकता नसते. त्यामुळे अडचणीच्या काळात मागचा पुढचा कसलाही विचार न करता पर्सनल लोन घेतो. कारण कर्जाच्या व्याजापेक्षा गरज महत्त्वाची असते. लग्न, वैद्यकीय इमर्जंसीत अनेक जण पर्सनल लोनचा पर्याय निवडतात. पर्सनल लोनसाठी नोकरदार लोकांचा पगार दरमहा किमान 15000 असणं आवश्यक आहे. या व्यतिरिक्त पर्सनल लोनसाठी CIBIL स्कोअर महत्वाचा असतो. तुमचा CIBIL स्कोर खराब असल्यास कर्ज मिळण्यात अडचण येते.पर्सनल लोन घेण्याचे काही फायदे आणि तोटे आहेत. जर तुम्हाला याबाबत माहिती नसेल तर जाणून घेऊयात...


जाणून घ्या फायदे


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

- पर्सनल लोन कोलेट्रल फ्री लोन आहे. लोनसाठी कोणतीही वस्तू तारण म्हणून ठेवण्याची आवश्यकता नसते. 


- गृहकर्ज, कार कर्ज, दुचाकी कर्ज इत्यादींपैकी बहुतांश कर्जांमध्ये कर्जाच्या वापरावर बंधने आहेत. पर्सनल लोनसाठी कोणतेही बंधन नाही. तुमच्या इच्छेनुसार आणि गरजेनुसार तुम्ही कुठेही वापरू शकता.


- पर्सनल लोनची परतफेड करण्यासाठी मोठा कालावधी दिला जातो. 12 महिने ते 60 महिन्यांदरम्यान हा कालावधी असतो. तुमच्या सोयीनुसार परतफेडीचा कालावधी निवडू शकता.


- तुम्ही बँकेकडून कर्ज म्हणूनही मोठी रक्कम घेऊ शकता. मात्र,  तुम्हाला पात्रता निकष पूर्ण करावे लागतील.


Bank Locker Rules: बँक लॉकरच्या नियमांमध्ये मोठा बदल, मौल्यवान वस्तू ठेवण्यापूर्वी ही बातमी वाचा


जाणून घ्या तोटे


- गृहकर्ज, कार कर्ज इत्यादींच्या तुलनेत पर्सनल लोनचा व्याजदर खूप जास्त आहेत. अशा परिस्थितीत, कर्जाची परतफेड करताना तुम्हाला मोठा ईएमआय भरावा लागतो. 


- तुम्हाला कर्ज घ्यायची गरज भासली तरी तुम्ही सहज परतफेड करू शकता तेवढीच रक्कम घ्या. कर्ज घेण्यापूर्वी त्याच्या EMI बद्दल जाणून घ्या. तुम्ही ऑनलाईन कॅलक्युलेटरद्वारे पर्सनल लोन EMI तपासून घ्या.


- पर्सनल लोनसाठी प्री-पेमेंट शुल्क भरावे लागते. याशिवाय पर्सनल लोनमध्ये प्रोसेसिंग फी देखील खूप जास्त आहे.