Know Personality By Face: आपली ओळख चेहऱ्यावरुन कळते. पण पर्सनॅलिटी (Personality) आपल्याला शरीरयष्टी (physique), स्वभाव (nature) आणि वागण्यावरुन होत असते. जन्म झाल्यावर सगळ्यांच्या चेहऱ्यावर वेगवेगळे फिचर (feature) असतात. आज आम्ही तुम्हाला कपाळावरुन पर्सनॅलिटी कशी ओळखता येते हे सांगणार आहोत...(Personality Test Know the secret of your personality from your forehead secret tip nz)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

1. कपाळ मोठे असल्यास (Broad Forehead)
आयुष्यात यशस्वी होण्यासाठी तुम्ही मल्टीटास्कर, बुद्धिमान, संघटित असणे खूप गरजेचे आहे. ज्या व्यक्तींचे कपाळ मोठे असते त्याच्यांमध्ये हे गूण पाहायला मिळतात. अनेकदा सेलिब्रिटी (celebrity), रॉयल लोकांचे कपाळ मोठे असते. अशा व्यक्तींमध्ये एक अवगुण ही असतो. अशा लोकांना राग पटकन येतो आणि ते व्यक्त करताना समोरील व्यक्तीच्या भावनांचा (feelings) विचार न करता ऐकवून मोकळे होतात.


2. कपाळ अरुंद असल्यास (Narrow Forehead)
कपाळ अरुंद असलेल्या व्यक्ती सकारात्मक (positive) असतात. ही लोकं स्वत:च्या मनाचे ऐकतात. अशी लोकं स्वतःचं मन दुखवलं नये यासाठी लोकांपासून थोडे लांबच राहतात. अशी लोकं फार दयाळू, मदत करणारी स्वत:चा अभिमान जपणारी असतात. हे लोक समाजासाठी स्वत:ला बदलत नाहीत. प्रेमाच्या बाबतीत प्रियकरासोबत एकनिष्ठ असतात.


3. कपाळ वक्र असल्यास (Curved Forehead)
कपाळ वक्र असलेल्या व्यक्तींना मैत्री (friendship) करण्यास जास्त प्रयत्न करावे लागत नाहीत. या व्यक्तींना कुठे बोलावे, केव्हा काय बोलावे याची जाणीव असते. या व्यक्ती स्वत:ही सकारात्मक असतात आणि आसपासच्या व्यक्तींना ही सकारात्मक ठेवतात. अशा व्यक्ती इतरांना त्यांची  स्वप्ने (dreams) आणि ध्येये (goals) साध्य करण्यासाठी प्रोत्साहित करतात.


4. कपाळ M-आकाराचे असल्यास (M shaped Forehead)
कपाळ M-आकाराचे असल्यास त्या व्यक्ती कलाकार असतात. या व्यक्ती तेच करतात जे त्यांना करायला आवडते. त्यांच्या प्रत्येक गोष्टींमध्ये  वेगळेपणा असतो. या व्यक्ती आकर्षक देखील असतात. या व्यक्तींना फारसा राग येत नाही. ते सहज माफ करतात. या व्यक्ती प्रियजन, कुटुंब आणि मित्रांच्या बाबतीत अतिसंवेदनशिल असतात.


(Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. दैनंदिन आयुष्यात याचा वापर करायचा झाल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)