नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टात सगळ्या राज्यांमध्ये दारुविक्री थांबवावी म्हणून एक याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिकेत म्हटलं गेलं आहे की, कोरोना संकटात जेव्हा पासून दारुविक्री सुरु झाली आहे, तेव्हापासून कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे दारुविक्री तात्काळ बंद करण्यात यावी.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ज्या प्रकारे सिगरेटच्या पाकिटावर सूचना लिहिलेली असते. तसेच दारुच्या बाटलीवर देखील लिहिण्यात यावे की, दारु पिल्यामुळे काय दुष्परिणाम होतात.


कोरोना संकटात सुप्रीम कोर्टाने तमिळनाडू हायकोर्टाचा तो निर्णय देखील बदलला होता. ज्यामध्ये दारुची दुकानं बंद करण्याचे आदेश देण्यात आले होते. सुप्रीम कोर्टाने म्हटलं होतं की, हे तमिळनाडु सरकारवर आहे, की त्यांना राज्यात दारुविक्री कशा प्रकारे सुरु ठेवायची आहे. दारुविक्री कशी करावी हे कोर्ट नाही सांगू शकत. सुप्रीम कोर्टाने म्हटलं होतं की, हा निर्णय राज्य सरकारच्या अधिकारात येतो.'