नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमती कमी झाल्याने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात देखील घट झाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमतींमध्ये १० टक्क्यांनी घसरण झाल्याने पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये घसरण पाहायला मिळते आहे. १० टक्के घट झाली असली तर मात्र ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी अपेक्षेपेक्षा खूप कमी घट केली आहे.


पेट्रोलचे दर


सोमवारी पेट्रोलचे दर २१ पैशांनी तर डिझेल २८ पैशांनी कमी झालं आहे. यानंतर राजधानी दिल्लीच पेट्रोलचा भाव ७३.०१ रुपये, कोलकातामध्ये ७५. ७० तर मुंबईमध्ये ८०.८७ रुपये आहे.


डिझेलचे दर


डिझेलचे सोमवारी दिल्लीत दर ६३.६२ रुपये, कोलकातामध्ये ६६.२९ रुपये तर मुंबईमध्ये ६७.७५ रुपये आणि चेन्नईमध्ये ६७.०९ रुपये झाला आहे.