मुंबई : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाचे दर कमी झाल्याने देशवासियांना थोडा दिलासा मिळाला आहे. सोमवारी पेट्रोल आणि डिझेलचे दर काही प्रमाणात कमी झाले. रविवारी पेट्रोलचे दर 7 पैशांनी कमी झाले होते. दिल्लीमध्ये एक लीटर पेट्रोलसाठी 76.30 रुपये मोजावे लागत होते.


मुंबईमध्ये 83.75 रुपये प्रति लीटर पेट्रोल मिळत आहे. कोलकातामध्ये 79.15 आणि चेन्नईमध्ये 79.25 रुपये प्रति लीटर पेट्रोलचे दर आहेत. डिझेलच्या बाबतीत बोलायचं झालं तर दिल्लीमध्ये एक लीटर डिझेल 67.89 रुपये प्रति लीटर होतं. कोलकातामध्ये यासाठी 70.56 रुपये प्रति लीटर मोजावे लागत होते. मुंबईमध्ये डिझेल 72.07  रुपये प्रति लीटर झालं आहे. चेन्नईमध्ये 71.70 रुपये प्रति लीटर डिझेल मिळत आहे.