नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलचे दर पुन्हा एकदा वाढणार आहेत. सरकारने ऑईल मार्केटिंग कंपन्यांचं कमीशन वाढवलं आहे. त्यामुळे आता पेट्रोलचे दर वाढले आहे. डीलरों कमीशनमध्ये ही वाढ करण्यात आली आहे.


रिपोर्टनुसार, पेट्रोल आणि डिझेलचे दर जे क्रूड ऑईलच्या आंतरराष्ट्रीय किंमतींवर आधारीत असते. यामध्ये आजपासून वाढ होणार आहे. पेट्रोलमध्ये एक रुपए प्रति लीटर तर डिझेलमध्ये 0.72 रुपए वाढणार आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर पेट्रोल-डिझेलचे दर घसरले असले तरी कमिशन वाढवल्यामुळे दर वाढणार आहेत. याआधी प्रॉफिट मार्जिन कमी करण्यासाठी ऑल इंडिया पेट्रोलियम डीलर्स एसोसिएशनने संपाचा इशारा दिला होता.