नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलचे दर लागोपाठ वाढत आहेत.  20 दिवसानंतर सोमवारी पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले. त्यानंतर मंगळवारी आणि बुधवारी पुन्हा दर वाढले आहेत. राजधानी दिल्लीत पेट्रोलचे दर 75 रुपये प्रति लीटरच्या वर पोहोचला आहे. डिझेलच्या दरांमध्ये देखील वाढ झाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बुधवारी दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर 15 पैशांनी वाढून 75.10 रुपये झाला. कोलकातामध्ये दर 77.79 रुपये, मुंबईमध्ये 82.94 रुपये आणि चेन्नईमध्ये 77.93 रुपये प्रति लीटरवर पोहोचला. डिझेलबद्दल बोलायचं झालं तर बुधवारी दिल्लीमध्ये त्याचा दर 21 पैशांनी वाढून 66.57 रुपये झाला आहे. कोलकातामध्ये दर 69.11 रुपये, मुंबईमध्ये 70.88 रुपये आणि चेन्नईमध्ये 70.25 रुपये प्रति लीटर झाला आहे.


रुपया पडल्याने आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चं तेल महागल्याने पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चं तेल 42 महिन्यांच्या सर्वात वरच्या स्तरावर पोहोचलं आहे. WTI क्रूडचा दर 71 डॉलरच्या वर पोहोचला आहे. ब्रेंट क्रूडचा दर 80 डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहोचला आहे.