नवी दिल्ली : पेट्रोल-डिझेलचे दर आज पुन्हा एकदा कमी झाले आहेत. सोमवारी पेट्रोल-डिझेलचे दर 14 पैशांनी कमी झालं. तेल कंपन्य़ांना देशातील 4 मोठ्य़ा शहरांमधील दर कमी केले आहेत. तर डिझेलचे दर देखील 10 पैशांनी स्वस्त झालं आहे. लागोपाठ 27व्या दिवशी पेट्रोल, डिझेल स्वस्त झालं आहे. 30 मे पासून पेट्रोल-डिझेलचे दर कमी होण्यास सुरुवात झाली आहे. मध्ये काही दिवस एक-दोन दिवस दर स्थिर होते. पण 27 दिवसामध्ये पेट्रोल जवळपास 3 रुपयांनी कमी झालं आहे.


आजचा दर


राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर 75.69 रुपये होते. तर डिझेल 67.48 रुपये प्रती लीटर आहे. दिल्ली, चेन्नई आणि कोलकातामध्ये पेट्रोल 10 पैशांनी कमी झालं आहे तर मुंबईत पेट्रोल 14 पैशांनी कमी झालं आहे. डिझेल दिल्ली आणि कोलकातामध्ये 6 पैशांनी कमी झालं आहे तर मुंबई आणि चेन्नईमध्ये 7 पैशांनी कमी झालं आहे. मुंबईत पेट्रोल 14 पैशांनी कमी होत 83.30 रुपये प्रति लीटर झालं आहे तर डिझेल 71.66 रुपए प्रति लीटर झालं आहे.