पेट्रोल-डिझेल पुन्हा स्वस्त, पाहा काय आहेत आजचे दर
वर्षभरातील सर्वात कमी दरावर पोहोचलं पेट्रोल
नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच दर कमी होत असल्याने पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होत आहेत. गुरुवारी दिल्लीमध्ये पेट्रोल ५ पैशांनी स्वस्त झालं. तर डिझेल ७ पैशांनी स्वस्त झालं आहे. दिल्लीमध्ये आज एक लीटर पेट्रोल ६९.७३ रुपये झालं तर डिझेल ६३.७६ रुपये प्रति लीटर झालं.
लिबियात कच्चा तेलाचं उत्पादन वाढलं आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोल आणि डिझेलचे दर ४० टक्क्यांनी कमी झाले आहे. पेट्रोलचे आजचे दर गेल्या १ वर्षातील सर्वात कमी दरावर पोहोचले आहे. १ जानेवारी २०१८ ला पेट्रोलचे दर ६९.९७ रुपये होते. कोलकातामध्ये पेट्रोल ७२.७२ रुपये प्रति लीटर, मुंबईमध्ये ७७.८७ रुपये प्रति लीटर आणि चेन्नईमध्ये ७२.५३ रुपये प्रतिलीटर होतं.
पेट्रोलचे दर
शहर | आजचे दर | कालचे दर
नवी दिल्ली ₹ 69.74 ₹ 69.79
कोलकाता ₹ 71.84 ₹ 71.89
मुंबई ₹ 75.36 ₹ 75.41
चेन्नई ₹ 72.36 ₹ 72.41
बंगळुरु ₹ 70.36 ₹ 70.35
भुवनेश्वर ₹ 68.61 ₹ 68.83
चंडीगढ ₹ 65.94 ₹ 65.98
हैदराबाद ₹ 73.96 ₹ 74.02
जयपूर ₹ 70.51 ₹ 70.56
लखनऊ ₹ 69.60 ₹ 69.64
पटना ₹ 74.19 ₹ 73.89
त्रिवेंद्रम ₹ 73.13 ₹ 72.67
डिझेलचे दर
शहर | आजचे दर | कालचे दर
नवी दिल्ली ₹ 63.76 ₹ 63.83
कोलकाता ₹ 65.51 ₹ 65.59
मुंबई ₹ 66.72 ₹ 66.79
चेन्नई ₹ 67.31 ₹ 67.38
बंगळुरु ₹ 64.16 ₹ 64.18
भुवनेश्वर ₹ 68.20 ₹ 68.45
चंढीगड ₹ 60.71 ₹ 60.78
हैदराबाद ₹ 69.29 ₹ 69.37
जयपूर ₹ 66.14 ₹ 66.21
लखनऊ ₹ 63.09 ₹ 63.15
पटना ₹ 67.32 ₹ 67.07
त्रिवेंद्रम ₹ 68.75 ₹ 68.35