Petrol-Diesel Price : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या (crude oil) किमतीत मोठी वाढ झाली आहे. कच्च्या तेलाच्या किमती 2.06 डॉलरने वाढून प्रति बॅरल 73.86 डॉलरने विकले जात आहे. त्याच वेळी, ब्रेंट क्रूड 1.95 डॉलरच्या वाढीसह प्रति बॅरल 78.47 डॉलरला विकले जात आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या ताज्या किमती आज, 8 जुलै रोजी देशभरात जाहीर करण्यात आल्या आहेत. राष्ट्रीय स्तरावर इंधनाच्या दरात कोणताही मोठा बदल झालेला दिसत नाही. कच्च्या तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमतींनुसार भारतात इंधनाची किंमत निश्चित केली जाते. भारतात दररोज सकाळी 6 वाजता इंधनाचे दर सुधारित केले जातात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्रात पेट्रोल 57 पैशांनी तर डिझेल 54 पैशांनी स्वस्त झालं आहे. पश्चिम बंगालमध्ये पेट्रोल 44 पैशांनी तर डिझेल 41 पैशांनी स्वस्त झालं आहे. हरियाणामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 29 पैशांची घसरण झाली आहे. राजस्थान आणि केरळमध्येही पेट्रोल-डिझेल स्वस्त झाले आहे. हिमाचल, कर्नाटक, गुजरात आणि गोव्यासह इतर काही राज्यांमध्ये इंधनाच्या किमतीत अगदीच किरकोळ वाढ झाली आहे.


जाणून घ्या पेट्रोल आणि डिझेलचे दर


- दिल्लीत पेट्रोल 96.71 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर
- मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर
- कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर
- चेन्नईमध्ये पेट्रोल 102.73 रुपये आणि डिझेल 94.33 रुपये प्रति लिटर


या शहरांमध्ये लागू झाले नवे दर


- नोएडामध्ये पेट्रोल 96.64 रुपये आणि डिझेल 89.82 रुपये प्रति लिटर झाले आहे.
- गाझियाबादमध्ये 96.58 रुपये आणि डिझेल 89.75 रुपये प्रति लिटर.
लखनऊमध्ये पेट्रोल 96.47 रुपये आणि डिझेल 89.66 रुपये प्रतिलिटर झाले आहे.
- पाटणामध्ये पेट्रोल 107.24 रुपये आणि डिझेल 94.04 रुपये प्रति लिटर झाले आहे.
- पोर्ट ब्लेअरमध्ये पेट्रोल 84.10 रुपये आणि डिझेल 79.74 रुपये प्रति लिटर झाले आहे.


दरम्यान, 22 मे पासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढलेल्या किमती कमी होण्याची सर्वसामान्य नागरिक सातत्याने मागणी करत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडच्या किमतीत चढ-उतार सुरूच आहेत.


15 रुपयांपर्यंत येऊ शकतात पेट्रोलचे दर  - नितीन गडकरी


दुसरीकडे गेल्या एक वर्षाहून अधिक काळ देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. पेट्रोलचा दर 100 रुपयांच्या आसपास कायम आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर गेल्या वर्षभरात कच्च्या तेलाच्या किमतीत बरेच चढ-उतार झाले आहेत, मात्र तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. अशातच केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या काही महिन्यांत देशातील पेट्रोलचे दर प्रतिलिटर 15 रुपयांपर्यंत खाली येऊ शकतात. संपूर्णपणे इथेनॉलवर चालणारी नवीन वाहने देशात आणली जातील, असे नितीन गडकरी यांनी म्हटलं  आहे. ऑगस्टमध्ये टोयोटाची कॅमरी कार लॉन्च करण्यात येणार आहे, जी 60 टक्के इथेनॉल आणि 40 टक्के विजेवर चालणार आहे.