आज पुन्हा पेट्रोल-डिझेल दरांत बदल, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर...
गेल्या काही दिवसांत इंधनाचे दर गगनाला भिडलेले दिसले...
मुंबई : पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये दररोज होणाऱ्या बदलांमुळे ग्राहक जवळपास धास्तावलेलेच दिसतात... पण आज पुन्हा ग्राहकांना थोडा का होईना दिलासा मिळालाय. कारण, पेट्रोल-डिझेलचे दर थोडे कमी झालेत.
शुक्रवारी पेट्रोलच्या दरांत १९ पैसे आणि डिझेलच्या दरांत १४ पैशांची घसरण झालीय. या घसरणीनंतर मुंबईत पेट्रोल ८४.६८ रुपये प्रती लिटर आणि डिझेल ८४.६८ प्रति लीटर झालंय...
तर राजधानी दिल्लीत पेट्रोल ७९.१८ रुपये प्रती लिटर आणि डिझेल ७३.६४ प्रति लीटर झालंय.
गुरुवारी पेट्रोलच्या किंमतीत १८ पैशांनी तर डिझेलच्या दरात १६ पैशांनी घसरण नोंदविण्यात आली होती. गेल्या १६ दिवसांपासून पेट्रोल-डिझेलचे दर घसरताना दिसत आहेत.
गेल्या काही दिवसांत इंधनाचे दर गगनाला भिडलेले दिसले... यावर स्पष्टीकरण देताना आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईलच्या किंमतीत होणाऱ्या वाढीमुळे दर वाढत असल्याचं स्पष्टीकरण सरकारकडून दिलं जात होतं. यावर विरोधकांकडून जोरदार टीका होतेय.