नवी दिल्ली :  केंद्र आणि राज्य सरकारने आपापल्या हिश्श्याचा टॅक्स कमी केला. परंतु, पेट्रोल - डिझेल दर कपातीविरोधात पेट्रोल पंप चालक - मालक आक्रमक संघटनांनी 'नो पेर्चेस'चा निर्णय घेतला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केंद्र आणि राज्य सरकारने केलेल्या दर कपातीमुळे चालक आणि मालकी यांचे हजारो कोटीचे नुकसान झाले. पूर्वकल्पना किंवा कोणतेही नियोजन न करता दर कपात केल्याने त्यांच्यात नाराजी पसरली. याच नाराजीतून 31 मे रोजी तेल कंपन्यांकडून पेट्रोल, डिझेलची खरेदी केली जाणार नाही असा निर्णय पेट्रोल पंप चालक - मालक यांनी घेतला.


संपूर्ण देशभरातील पेट्रोल - डिझेल चालक मालक होणार नो पर्चेसमध्ये सहभागी होणार आहेत तर महाराष्ट्रातील 6500 पेट्रोल - डिझेल चालक मालक 'नो पर्चेस' करणार आहेत.


पेट्रोल - डिझेल चालक मालक यांनी हा निर्णय घेतला असला तरी भारतात आयात होणाऱ्या ब्रेंट क्रूड ऑईलचा भाव दोन महिन्यातल्या उच्चांकी पातळीवर पोहचला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूडचा भाव १२० डॉलर प्रति बॅलर इतका वाढला आहे. 


शनिवार रविवारच्या सुटीनंतर आज आशियाई बाजार उघडल्यावर ब्रेंटचा भाव ६ टक्क्याने वाढला आहे. त्यामुळे जून महिना सुरु होता होता देशात पुन्हा एकदा इंधन महागण्याची चिन्हे दिसू लागली आहेत