Petrol-Diesel Price Today: दिलासादायक! पेट्रोल-डिझेलचे दर `जैसे थे`, एका क्लिकवर झटपट चेक करा आजचे दर
Petrol-Diesel Price Today: आंतरराष्ट्रीय बाजारात आज कच्च्या तेलाच्या किमतीत तेजीचे सत्र सुरू झाले आहे. मात्र याचा परिणाम पेट्रोल-डिझेलच्या दरावर झाला असून आज पेट्रोल-डिझेलचे दर जैसे थे असणार आहेत.
Petrol-Diesel Price on 8 May 2023 : भारतातील पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol and diesel prices) दररोज सकाळी 6 वाजता सरकारी तेल कंपन्या जाहीर करतात. त्यानुसार आठवड्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे 8 मे रोजी दैनंदिन इंधनाचे दर जारी करण्यात आले आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील काही भागात पेट्रोलच्या किमतीत वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. येथे पेट्रोलचे दर 10 पैशांनी आणि डिझेलचे दर 9 पैशांनी वाढले आहेत, त्याची सुधारित किंमत 102.73 रुपये आणि 94.33 रुपये प्रति लीटर आहे. याशिवाय दिल्ली, मुंबई आणि कोलकाता येथे दर स्थिर आहेत. (Petrol and diesel prices on 8 May 2023 )
दरम्यान आज (8 मे 2023) दिल्लीत एक लिटर पेट्रोल 96.72 रुपये प्रति लीटर तर डिझेल 89.62 रुपये प्रति लिटरवर उपलब्ध असणार आहे. तर देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत (Mumbao Petrol Rate) पेट्रोलचा दर 106.31 रुपये आणि डिझेलचा दर 94.27 रुपये प्रतिलिटर आहे. कोलकात्यात पेट्रोलचा दर 106.03 रुपये तर डिझेलचा दर 92.76 रुपये प्रति लिटर आहे. तर चेन्नईमध्येही पेट्रोल 102.63 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर आहे.
कच्चा तेलाच्या किमतीत वाढ
आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली. ब्रेंट क्रूड तेलाच्या किमती 3.86 टक्क्यांनी वाढून प्रति बॅरल 75.30 डॉलरवर बंद झाल्या. त्याच वेळी, डब्ल्यूटीआय कच्च्या तेलाच्या किंमतीत 4.05 टक्के वाढ नोंदवली गेली आहे आणि ती प्रति बॅरल 71.34 डॉलरवर बंद झाली आहे. तर आज ही तिच परिस्थिती कायम राहिली असून पेट्रोल आणि डिझेलचे दर जैसे थे असल्याचे पाहायला मिळत आहे.
शहर | पेट्रोलचे दर | डिझेलचे दर |
लखनौ | 96.57 | 89.76 |
दिल्ली | 96.72 | 89.62 |
पाटणा | 107.95 | 94.70 |
जयपूर | 108.78 | 93.99 |
पुणे | 105.96 | 92.48 |
आग्रा | 96.38 | 89.55 |
मुंबई | 106.31 | 94.27 |
अहमदाबाद | 96.98 | 92.73 |
ठाणे | 105.97 | 92.47 |
नागपूर | 106.06 | 92.61 |
SMS वर जाणून घ्या आदचे दर
पेट्रोल आणि डिझेलचे आजचे लेटेस्ट दर तुम्ही एसएमएसद्वारे मिळवू शकता. यासाठी तुम्हाला इंडियन ऑइलच्या वेबसाइटवर जाऊन RSP मिळेल आणि तुमचा शहर कोड लिहून 9224992249 या नंबरवर पाठवला जाईल. प्रत्येक शहराचा कोड वेगळा आहे, जो तुम्हाला IOCL वेबसाइटवरून घ्यावा लागेल.