मुंबई : पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये आज पुन्हा एकदा वाढ झाली आहे. दरवाढीचा आजचा सलग अकरावा दिवस आहे. मुंबईसह राज्यभरात आज पेट्रोल १६ पैसे आणि डिझेल २० पैसे महाग झालं आहे. आज मुंबईत एक लीटर पेट्रोलसाठी ८६ रुपये ७२ पैसे तर डिझेलसाठी ७५ रुपये ५४ पैसे मोजावे लागत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रत्नागिरीत आज ८७ रुपये ७८ पैसे तर नागपुरात पेट्रोलचा दर ८७ रुपये २८ पैसे तर पुण्यात ८६ रुपये ५८ पैसे मोजावे लागत आहेत.


पेट्रोलचे आजचे दर


दिल्ली 79.4 रुपये


कोलकाता 82.31 रुपये


मुंबई 86.72 रुपये


चेन्नई 82.51 रुपये


डिझेलचे आजचे दर


दिल्ली 71.43 रुपये


कोलकाता 74.27 रुपये


मुंबई 75.74 रुपये


चेन्नई 75.48 रुपये