पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा कपात, पाहा आजचे दर
पेट्रोल अजूनही ८० च्या खाली येत नसल्याने सर्वसामान्यांमध्ये नाराजी
मुंबई : पेट्रोल आणि डिझेल या दोन्हीच्या दरांमध्ये पुन्हा एकदा कपात झालीय. पेट्रोल प्रतिलिटर १६ पैशांनी तर डिझेलचे दर प्रतिलिटर १३ पैशांनी कमी झालेत. मुंबईत पेट्रोलचा दर ८३ रुपये २४ पैसे तर डिझेलचा दर प्रति लिटर ७५ रुपये ९२ पैसे झालायं. दिल्लीतही पेट्रोलचे दर १६ पैशांनी कमी झाले आहेत. त्यामुळे दिल्लीत पेट्रोलचा दर ७७ रुपये ७३ पैसे प्रति लीटर असेल तर डिझेलच्या किंमती प्रति लिटर १२ पैशांनी कमी झाल्यात. त्यामुळे दिल्लीत डिझेलचा दर ७२ रुपये ४६ पैसे झालाय.
मागील २५ दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेल या दोन्हीच्या किंमतीत काही अंशी का होईना घट होताना दिसतेय.
मात्र पेट्रोल अजूनही ८० च्या खाली येत नसल्याने सर्वसामान्यांकडून नाराजी आहे.
ऑक्टोबरनंतर 20 टक्के घसरण
आंतरराष्ट्री बाजारात कच्चे तेल 3 ऑक्टोबर 2018 ला ब्रेंट क्रूड 86.74 डॉलर प्रति बॅरल होतं. ज्यामध्ये 9 नोव्हेंबर 2018 ला घसरण होऊन 69.70 डॉलर प्रति बॅरल झालं. WTI क्रूड देखील 20 टक्क्यांनी कमी होऊन 65.60 डॉलर प्रति बॅरल झालंय.
आंतरराष्ट्रीय बाजारातील पंधरवड्यात सुरू असलेल्या किंमतीवरून सरकारी तेल कंपन्या पेट्रोल डीझेलच्या दरातील चढउताराचा हिशोब ठरवतात.या हिशोबानुसार तर भारतात पुढच्या पंधरवड्यात पेट्रोल डीझेलच्या किंमतीत मोठी घसरण होण्याची शक्यता आहे.
21 दिवसांपासून घसरण
गेल्या 21 दिवसांपासून पेट्रोल डीझेलच्या किंमतीत घसरण पाहायला मिळतेयं. मुंबईमध्ये पेट्रोलची किंमत 76.22 रुपये प्रति लीटर आहे. केंद्र सरकारने किंमती केल्यानंतर शुक्रवारी सलग 21 व्या दिवशी पेट्रोल डीझेलच्या किंमतीत कपात झाल्याचे पाहायला मिळतंय.