आठवड्याच्या पहिल्या दिवशी Petrol-Diesel च्या दरात बदल, जाणून घ्या तुमच्या शहरातील भाव
Petrol-Diesel Price Today : पेट्रोल आणि डिझेलचे दर रोज सकाळी 6 वाजता तेल कंपन्यांकडून जारी केले जातात. त्यानुसार जाणून घ्या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणते बदल झाले...
Petrol-Diesel price on 15 May 2023 : सरकारी तेल कंपन्यांनी सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर (Petrol-Diesel price ) जाहीर केल्यानंतर महानगरांपासून छोट्या शहरांपर्यंत इंधनाचे दर अपडेट करण्यात येते. देशाची राजधानी नवी दिल्लीसह चारही महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. तर अनेक शहरांमध्ये इंधनाच्या दरांमध्ये किंचित बदल दिसून आला आहे. दरम्यान एप्रिल 2022 मध्ये सरकारी तेल कंपन्यांनी शेवटी इंधनाचे दर बदलले होते. त्यानंतर 2022 मध्ये 22 व्या दिवशी केंद्र सरकारने इंधन उत्पादन शुल्क कमी करून तेल कंपन्यांना तसेच ग्राहकांना थोडा दिलासा दिला आहे.
कच्चा तेलाच्या किमतीत चढ-उतार
दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत चढ-उतार दिसून येत असून, आज प्रति बॅरल $75 च्या खाली व्यापार करत आहे. बेंचमार्क ब्रेंट क्रूड $0.38 घसरून प्रति बॅरल $73.79 वर व्यापार झाला. त्याच वेळी, डब्ल्यूटीआय क्रूडची किंमत 0.46 टक्के किंवा प्रति बॅरल $ 0.33 घसरून प्रति बॅरल $ 69.72 वर आली. याचा परिणाम पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीतवर दिसून येतो.
वाचा : राज्य तापले! अनेक जिल्ह्यांचा पारा 40 शी पार, तुमच्या जिल्ह्यातील तापमान किती?
पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर
आठवड्याच्या पहिल्या दिवशी सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol-Diesel price ) जाहीर केल्यानंतर पुन्हा एकदा दर स्थिर असल्याचे पाहायला मिळत आहे. यामध्ये दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नई किंवा महानगरातील वाहनचालकांना महागड्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही दिलासा मिळणार नाही. शेवटी, 2022 मध्ये, राष्ट्रीय स्तरावर पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये बदल झाला होता. दिल्लीत एक लिटर पेट्रोल 96.72 रुपये तर डिझेल 89.62 रुपये प्रति लीटर आहे. कोलकात्यात पेट्रोल 106.03 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 92.76 रुपये आहे. चेन्नईमध्ये एक लिटर पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लीटर आहे. तर आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईत पेट्रोलची किंमत 106.31 रुपये आणि डिझेलची किंमत 94.27 रुपये आहे.
पेट्रोल-डिझेलचे दर कसे तपासायचे
तुम्ही इंडियन ऑइलचे ग्राहक असल्यास RSP<डीलर कोड> 9224992249 वर, HPCL ग्राहक 9222201122 वर, HPPRICE<डीलर कोड> आणि BPCL ग्राहक 9223112222 वर, एसएमएस SP<डीलर कोड> पाठवू शकता. यानंतर तुमच्या फोन नंबरवर एसएमएसद्वारे पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर समजतील.