मुंबई : आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये कच्च्या तेलाच्या किंमती सतत वाढताना दिसत आहेत. त्यामुळे तेल कंपन्यांच्या मार्जिनवर दबाव वाढताना दिसतोय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पेट्रोल-डिझेलवर एक्साइज ड्युटी कमी केल्यानंतर क्रूड ऑईल 19 टक्के महाग झालंय अशात लवकरच पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती एकाच वेळी 2 रुपये प्रति लिटर दराने वाढू शकतात.


सध्या क्रूडच्या किंती दररोज बदलल्या जातात. अशावेळी या किंमतीत दररोज 2 ते 3 पैशांचा फरक दिसतो. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, गुजरात निवडणुकीनंतर तेल कंपन्या पेट्रोल-डिझेलच्या दरात एका झटक्यात 2 रुपयांनी वाढवू शकतात. 


ऑक्टोबरच्या सुरुवातीला पेट्रोल-डिझेलच्या किंमत वाढताना पाहून सरकारनं या किंमती 2 रुपये प्रती लिटर एक्साइज ड्युटी कमी केली होती. त्यानंतर आता क्रूड 19 टक्क्यांपर्यंत महाग झालंय. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यापासून ऑईल कंपन्यांच्या मार्जिनवर दबाव दिसून येतोय.