मुंबई : आंतरराष्ट्रीय बाजारात गेल्या 10 महिन्यांमध्ये क्रूड ऑईलच्या (Crud Oil) दरात मोठी घसरण पहायला मिळाली. ब्रेंट क्रूड ऑईलचे दर 35 टक्क्यांनी घसरले. तर डब्ल्यूटीआयचे दरही 38 टक्क्यांनी कमी झाले आहेत. तज्ज्ञांनुसार, क्रूड ऑईलची जशी स्थिती आहे त्यानुसार येत्या काही दिवसांमध्ये ब्रेंट आणि डब्लयूटीआयचे दर 5 डॉलरने कमी होऊ शकतात. जर असं झालं तर ब्रेंट क्रूड ऑईलची किंमत 82 डॉलरवर येईल. ज्यामुळे भारतात पेट्रोल-डीझेलचे दर (Petrol Diesel Rate) कमी होण्याची शक्यता वाढेल. एका अनुमानानुसार, पेट्रोल-डीझेल 5 रुपयांनी स्वस्त होऊ शकतं. (petrol diesel fuel rate may be decresed by 5 ruppes know reason and deatils)


क्रूड ऑईल 10 महिन्यात किती स्वस्त?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

क्रूड ऑईलच्या दरात गेल्या 10 महिन्यांमध्ये 35 टक्क्यांनी घट झाली आहे. ब्रेंट क्रूडचे दर 7 मार्चला 139.13 डॉलर प्रति बॅरल इतके होते. ब्रेंट क्रूडचे आजच्या कारोबारी सत्रातील दर हे 87.81 डॉलर प्रति बॅरल इतके आहेत. या दरम्यान ब्रेंट क्रूड ऑईलच्या दरात 37 डॉलर प्रति बॅरल इतकी घसरण झाली आहे. तर दुसऱ्या बाजूला 7 मार्चला डब्ल्यूटीआयचे दर हे 130.50 डॉलर इतके होते, तोच दर आता 80.41 इतका आहे. या दरम्यान डब्ल्यूटीआयमध्ये 38 टक्क्यांनी घट झाली.


भारतावर काय परिणाम होणार?


भारत आवश्यकतेनुसार 85 टक्के क्रूड आईल आयात करतं. आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईलचे दर कमी झाल्यास त्याचा भारतात थेट परिणाम दिसून येतो. येत्या 2 आठवड्यात क्रूड ऑईलचे दर प्रति बॅरल 81 डॉलर इतके झाले, तर भारतात पेट्रोल आणि डीझेल लीटरमागे 5 रुपयांनी स्वस्त होईल, असं तज्ज्ञांचं मत आहे.