Petrol Diesel Price : सणासुदीत पेट्रोल-डिझेलचे दर घटणार? जाणून घ्या आजचे दर
Petrol Diesel Price : ऐन दिवाळीत सरकाने पेट्रोल-डिझेलबाबत महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. तर काही राज्यांनी व्हॅटमध्ये कपात करून ग्राहकांना दिलासा दिला.
Petrol-Diesel Price Today 20th October : गेल्या काही महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतीत अस्थिरता दिसून येत आहे. मात्र देशांतर्गत बाजारात पेट्रोल-डिझेलच्या (Petrol diesel Prices) दरात तेल कंपन्यांकडून कोणताही बदल करण्यात आलेला नाही. (petrol diesel latest price 20 october 2022 check rates)
22 मे 2022 रोजी केंद्राने उत्पादन शुल्कात कपात करून महागड्या तेलापासून दिलासा दिला. सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे पेट्रोल (petrol price) आठ रुपयांनी तर डिझेल (diesel price) पाच रुपयांनी स्वस्त झाले आहे. त्यावेळी काही राज्यांनीही व्हॅटमध्ये कपात करून ग्राहकांना दिलासा दिला.
कच्चे तेलाचे नवे दर
गुरुवारी (20 ऑक्टोबर) सकाळी WTI क्रूड $85.89 आणि ब्रेंट क्रूड $92.26 प्रति बॅरल वर दिसले. तर तेल कंपन्या भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL), इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमतीच्या आधारावर दररोज तेलाच्या किमती जारी करतात.
पेट्रोल किंवा डिझेलच्या दरात काही बदल झाल्यास त्याची अंमलबजावणी सकाळी 6 वाजल्यापासून केली जाते. जेव्हा वेगवेगळ्या राज्यांमध्ये व्हॅटप्रमाणे फरक असतो, तेव्हा राज्यांमधील पेट्रोल आणि डिझेलचे दर सारखे राहत नाहीत.
वाचा : दिवाळीचा फराळ बनवताय? आधी ही बातमी वाचा!
शहर आणि तेलाच्या किमती (Petrol-Diesel Price on 20th october)
- दिल्ली पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर
- मुंबई पेट्रोल 111.35 रुपये आणि डिझेल 97.28 रुपये प्रति लिटर
- चेन्नई पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर
- कोलकाता पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर
– नोएडामध्ये पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.96 रुपये प्रति लिटर
- लखनऊमध्ये पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.76 रुपये प्रति लिटर
- जयपूरमध्ये पेट्रोल 108.48 रुपये आणि डिझेल 93.72 रुपये प्रति लिटर
- तिरुअनंतपुरममध्ये पेट्रोल 107.71 रुपये आणि डिझेल 96.52 रुपये प्रति लिटर
- पाटण्यात पेट्रोल 107.24 रुपये आणि डिझेल 94.04 रुपये प्रति लिटर
- गुरुग्राममध्ये 97.18 रुपये आणि डिझेल 90.05 रुपये प्रति लिटर
- बेंगळुरूमध्ये पेट्रोल 101.94 रुपये आणि डिझेल 87.89 रुपये प्रति लिटर
- भुवनेश्वरमध्ये पेट्रोल 103.19 रुपये आणि डिझेल 94.76 रुपये प्रति लिटर
- चंदीगडमध्ये पेट्रोल 96.20 रुपये आणि डिझेल 84.26 रुपये प्रति लिटर
- हैदराबादमध्ये पेट्रोल 109.66 रुपये आणि डिझेल 97.82 रुपये प्रति लिटर
- पोर्ट ब्लेअरमध्ये पेट्रोल 84.10 रुपये आणि डिझेल 79.74 रुपये प्रति लिटर
तुमच्या शहरांतील दर कसे तपासाल?
तुम्ही जर बीपीसीएलचे (BPCL) ग्राहक असाल तर पेट्रोल-डिझेलची किंमत तपासण्यासाठी RSP <डीलर कोड> लिहा आणि 9223112222 या क्रमांकावर पाठवा. दुसरीकडे, HPCL ग्राहक HPPRICE <डीलर कोड> लिहून 9222201122 या क्रमांकावर पाठवतात. दुसरीकडे, इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP<डीलर कोड> लिहून 9224992249 या क्रमांकावर पाठवतात. त्यानंतर तुम्हाला आजच्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीची माहिती मेसेजद्वारे मिळेल.