नवी दिल्ली : कर्नाटक विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर आता सर्वसामान्य नागरिकांना एक मोठा झटका लागणार असल्याचं दिसत आहे. कारण, पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत मोठी वाढ होणार आहे.


इतक्या रुपयांनी होणार वाढ


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत तब्बल चार रुपयांनी वाढ होण्याची शक्यता आहे. कोटक इंस्टिट्युशनल इक्विटीजच्या एका रिपोर्टमध्ये म्हटलं आहे की, जर सार्वजनिक क्षेत्रातील पेट्रोलियम कंपन्या कर्नाटक निवडणुकांपूर्वीचा नफा मिळवायचा असेल तर या किमती वाढवणं गरजेचं आहे.


कर्नाटक विधानसभा निवडणुका पार पडताच इंडियन ऑईल कॉर्पोरेशन, हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आणि भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनने सोमवारी १९ दिवसांनंतर पेट्रोल-डिझेलच्या किमतीत वाढ केली.


चार दिवसांत ६९ पैशांनी महागलं पेट्रोल


चार दिवसांत पेट्रोलच्या दरात ६९ रुपये प्रति लिटर वाढ झाली आहे. यामध्ये २२ पैसे प्रति लिटरची वाढ आज करण्यात आली. या दरवाढीमुळे दिल्लीत पेट्रोलचे दर ७५.३२ रुपयांवर पोहोचले असून हा पाच वर्षांतील उच्चांक आहे. तर, डिझेलच्या दरात ८६ पैसे प्रति लिटर वाढ करण्यात आली आहे. यामध्ये २२ पैसे प्रति लिटरची वाढ आज करण्यात आली. त्यामुळे दिल्लीत डिझेलचा दर ६६.७९ रुपये प्रति लिटर झाला आहे.


कंपन्या असा मिळवणार नफा


रिपोर्टमध्ये म्हटलं आहे की, पेट्रोलियम कंपन्यांना डिझेलच्या दरात साडे तीन ते चार रुपये आणि पेट्रोलच्या दरात ४ रुपये ते ४.५५ रुपयांनी वाढ करणं गरजेचं आहे. असे केल्यास कंपन्यांना २.७ रुपये लिटरचं मार्जिन मिळेल.


खरचं वाढणार पेट्रोल-डिझेलचे दर


कोटक इक्विटीजच्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे की, डॉलरच्या किंमतीत स्थिर राहण्यावर ही दरवाढ अवलंबून असणार आहे. गेल्या आठवड्यात आयसीआसीआस सिक्युरिटीजने म्हटलं होतं की, तेल कंपन्यांचं मार्जिन ३१ पैसे प्रति लिटरने कमी आहे कारण, २४ एप्रिलनंतर पेट्रोल-डिझेलच्या दरांत वाढ झालेली नाहीये.