नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती शनिवारी सलग दहाव्या दिवशी कमी झालेल्या पाहायला मिळत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती घटल्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत घट होण्याच सत्र सुरूच आहे. गेल्या एका महिन्यात दिल्लीमध्ये पेट्रोल 6.54 रुपये आणि डिझेल 6.43 रुपये प्रति लीटर स्वस्त झालंय. मुंबईत पेट्रोलच्या किंमतीत 34 पैसे तर डिझेलच्या किंमतीत 39 पैसे प्रति लीटरने कपात झालीयं. मुंबईत पेट्रोल 78.09 रुपये प्रति लीटर तर डिझेल 70.50 रुपये प्रति लीटर आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


दिल्ली, कोलकाता, मुंबई आणि चेन्नई मध्ये शनिवार पेट्रोलचे दर क्रमश: 72.53 रुपये, 74.55 रुपये, 78.09 रुपये आणि 75.26 रुपये प्रति लीटर होते. या चारही शहरांतील डीझेलच्या किंमतीही क्रमश: 67.35 रुपये, 69.08 रुपये, 70.50 रुपये और 71.12 रुपये प्रति लीटर आहेत.


रुपया मजबूत 


खूप मोठ्या काळाच्या घसरणीनंतर आता रुपयांत मजबूतीचा ट्रेंड सुरू झालायं.



हे वर्ष संपेपर्यंत भारतीय रुपया आणखी मजबूत झालेला दिसेल. '2018 पर्यंत रुपयावर दबाव वाढला होता पण डिसेंबर पर्यंत भारतीय करंसी दोन ते तीन टक्क्यांनी मजबूत होऊ शकते', असं स्टैंडर्ड चार्टर्डमध्ये साउथ एशियाचे फॉरन एक्सचेंज, रेट्स आणि क्रेडिट हेड गोपीकृष्णन एमएस सांगतात.