मुंबई :  तेल कंपन्यांनी मार्च महिन्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत थोड्या प्रमाणात का होईना कपात केली होती, परंतु ही किंमत इतकीही कमी नव्हती की, सर्वसामान्यांना दिलासा मिळेल. पण आता अशी आशा आहे की, येणाऱ्या काळात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती मोठ्या प्रमाणात खाली येतील. खरंतर तेल निर्यात करणार्‍या देशांच्या संघटनेने (OPEC) आणि भागीदार देशांनी हळूहळू तेलाचे उत्पादन वाढविण्यास सहमती दर्शविली आहे.


दररोज 20 दशलक्ष बॅरल्सचे उत्पादन वाढेल


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तेल उत्पादक देशांनी (OPEC) म्हटले आहे की, त्यांनी मे ते जुलै या काळात दररोज तेलाचे दोन दशलक्ष बॅरल्स उत्पादन वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना साथीच्या आजारामुळे जागतिक अर्थव्यवस्थेला सावरताना आम्ही ही पावले उचलत आहोत असे OPECचे म्हणणे आहे. OPEC देशांनी उत्पादन कमी केले होते, ज्यामुळे कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या आहेत.


उत्पादन कसे वाढेल?


OPEC मे महिन्यात तेलाच्या उत्पादनात प्रति दिन 3.5 लाख बॅरल, जूनमध्ये देखील दररोज 3.5 लाख बॅरल आणि जुलैमध्ये 4 लाख बॅरलची वाढ करणार आहे. दरम्यान, सौदी अरेबियाने म्हटले आहे की, ते दररोज 10 लाख बॅरलचे अतिरिक्त उत्पादन करणार आहेत.


पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी केले जातील


कच्च्या तेलाच्या उत्पादनात वाढ झाल्यामुळे किंमती खाली येतील, ज्याचा थेट परिणाम देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींवर होऊ शकतो. कच्च्या तेलाच्या बाबतीत भारत मुख्यतः इतर देशांच्या आयातीवर अवलंबून आहे. भारत आपल्या गरजेच्या 80% पेक्षा जास्त तेलाची आयात करतो.


कच्चे तेल 64 डॉलरच्या पार


तुम्हाला आठवत असेल की, मार्चपासून संपूर्ण जगामध्ये कोरोनाच्या महामारीमुळे सर्वत्र लॅाकडाऊन होता. त्यावेळी कच्या तेलाची किंमत प्रति बॅरल 30 डॉलर झाली होती. आज ते 64 डॉलरच्या वर आहे. कोरोना साथीच्या काळात, मागणी कमी झाल्यामुळे कच्च्या तेलाच्या किंमतीत लक्षणीय घट झाली, म्हणूनच OPEC देशांनी मागील वर्षी उत्पादन कमी करण्याची घोषणा केली होती.