मुंबई : सणांच्या दिवसांत महागाई वाढण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आताच तुम्ही पेट्रोल किंवा डिझेल आपल्या गाडीत भरून घ्या. येत्या काही दिवसांत इंधनाच्या दरात वाढ होऊ शकते. केंद्र सरकार येत्या काही दिवसांत एक्साइज ड्यूटी वाढवण्याचा विचार करत आहे. या अगोदर मे २०२० मध्ये पेट्रोल १० रुपये प्रति लीटर आणि डिझेल १३ रुपये प्रति लीटर वाढणार असल्याचं म्हटलं जातं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सरकार कोरोना व्हायरस विरोधात लढा देत आहे. या दरम्यान एक्साइज ड्युटी वाढवण्याचा विचार केला जात आहे. रिपोर्टनुसार, इकोनॉमीला महामारीमुळे मोठा फटका बसाल आहे. या दरम्यान फंड्सची आवश्यकता आहे. सरकार आणखी एका पॅकेजची घोषणा करू शकते.  


आयएएनएसने दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या कठीण काळात आर्थिक बाजू सांभाळण्यासाठी सरकार हा निर्णय घेणार आहे. त्यामुळे जर पेट्रोल आणि डिझेलच्या उत्पादन शुल्कांमध्ये वाढ झाली तर संपूर्ण आर्थिक वर्षात एकूण ६०,००० कोटी रुपये मिळू शकतात. चालू आर्थिक वर्षामध्ये मार्चपर्यंत सरकार त्यातून ३०,००० कोटी रुपये जमा करू शकतं.


दरम्यान लॉकडाऊनच्या काळात सातत्याने पेट्रोल-डीझेलच्या दरात वाढ होत होती. पेट्रोल डिझेलच्या किमतीत झालेली भरमसाठ वाढ लक्षात घेता 50 पैसे पेट्रोलच्या दरात वाढ झाली म्हणून आंदोलन करणारे आज सत्ताधारी सरकारमध्ये मंत्री आहेत. त्यामुळे 2014 पूर्वीच्या किमती आणि आतच्या किमती लक्षात घेणे गरजेचे आहे. मे 2014 मध्ये पेट्रोलवर एकूण टॅक्स 9.48 रुपये प्रति लीटर आणि डिझेलवर 3.56 रुपये प्रति लीटर होता. तेव्हापासून आतापर्यंत पेट्रोलवरील टॅक्स वाढून 32.98 प्रति लीटर आणि डिझेलवरील टॅक्स 31.83 रुपये प्रति लीटर झाला आहे.