मुंबई : पेट्रोल-डिझेलच्या दरांत गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा एकदा चलबिचल पाहायला मिळत आहे. सोमवारी पेट्रोल-डिझेलचे भाव वाढलेले पाहायला मिळाल्यानंतर आज पुन्हा एकदा या भावांत वाढ झाल्याचं दिसून येत आहे. दिल्लीसहीत चारही महानगरांत मंगळवारी पेट्रोलच्या दरांत ५ पैशांनी वाढ झाली. याचसोबत राजधानी दिल्लीत पेट्रोलचे दर ७१.१७ रुपयांवर पोहचलंय. मंगळवारी डिझेलच्या किंमतींत १० पैशांनी वाढ होऊन हा दर ६६.२० रुपयांवर पोहचलाय. गेल्या आठवड्याभरात पेट्रोलच्या किंमतीत जवळपास २ रुपयांची वाढ झालेली पाहायला मिळालीय.


काय आहे तुमच्या शहरांतला दर


शहर पेट्रोल/लीटर डिझेल/लीटर
दिल्ली  ₹७१,१७ ₹६६.२०
मुंबई  ₹७६.७६ ₹६९.३४ 
कोलकाता ₹७३.१२ ₹६७.९३
चेन्नई ₹७३.८४ ₹६९.९५ 
नोएडा ₹७०.८८ ₹६५.३२ 
गुरुग्राम ₹७१.३९ ₹६५.४०

 

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशातील तेल कंपन्या प्रत्येक दिवशी पेट्रोल - डिझेलच्या किंमतींची समीक्षा करतात आणि नवे दर प्रत्येक दिवशी सकाळी ६ वाजल्यापासून पेट्रोल पंपांवर लागू होतात. आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमतींच्या आधारावर हे दर ठरवले जातात. यासाठी १५ दिवसांची सरासरी किंमत विचारात घेतली जाते. याशिवाय रुपया आणि डॉलरच्या विनिमय दरांचाही इंधनाच्या किंमतींवर प्रभाव दिसून येतो.