मुंबई : महिन्याच्या पहिल्याच दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात बदल पाहायला मिळाले. आता दुसऱ्या दिवशी पेट्रोलच्या दरात कपात झाली असून डिझेलच्या दरात स्थिरता मिळाली आहे. 1 नोव्हेंबर रोजी पेट्रोलच्या दरात 6 पैसे आणि डिझेलच्या दरात 5 पैशांनी कपात झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुसऱ्या दिवशी शनिवारी, दिल्लीत पेट्रोलच्या दरात 5 पैशांनी कपात झाली आहे. पण डिझेलचा दर मात्र स्थिर आहे. शनिवारी दिल्लीत पेट्रोलचा दर 72.81 रुपये आणि डिझेलचा दर 65.80 रुपये प्रती लीटर आहे. 


शनिवारी सकाळी कोलकाता, मुंबई आणि चैन्नईमध्ये पेट्रोलचे दर अनुक्रमे 75.52 रुपये, 78.48 रुपये आणि 75.68 रुपये आहे. तर डिझेलचे दर अनुक्रमे 68.19 रुपये, 68.99 रुपये आणि 69.54 रुपये असा आहे. क्रूड तेलाच्या दरात चढ-उतार सुरू आहे.  ऑक्टोबर महिन्यात पेट्रोलच्या दरात 2 रुपये प्रती लीटर तर डिझेलचा दर 1.50 रुपयांनी कपात झाली. 


दिवाळीनंतर पेट्रोल - डिझेलच्या किंमतीत घसरण होताना दिसतेय. यापूर्वी महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीचे निकाल आल्यानंतरही पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत घट झाल्याचं दिसून आलं होतं. मंगळवारी सकाळी पेट्रोलच्या दरात ६ पैसे तर डिझेलमध्ये १० पैसे प्रति लीटर घट झाली. 


तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, नजिकच्या भविष्यातही कच्च्या तेलाच्या किंमतीत स्थिरता दिसून येईल. ऑक्टोबरच्या सुरुवातीपासून आत्तापर्यंत पेट्रोलच्या किंमतीत १.५० रुपये प्रती लीटर तर डिझेलच्या किंमतीत १.२५ रुपये प्रती लीटर घट झाल्याचं दिसून येत आहे.