Petrol-Diesel Price on 18 May 2023 : आज तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol-Diesel Price) जाहीर केले आहेत. दिल्ली, कोलकाता, मुंबई आणि चेन्नई या चार शहरांमध्ये अनेक दिवसांपासून पेट्रोलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. काही शहरांमध्येच डिझेलचे दर वाढले आहेत. दरम्यान कच्चे तेल महाग झाल्यानंतरही पेट्रोल आणि डिझेलवर कोणताही परिणाम झालेला नाही. जाणून घ्या आज महागाईतून दिलासा मिळाला की नाही...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जागतिक बाजारपेठेतील कच्च्या तेलाच्या किमतींनुसार तेल कंपन्या भारतात दररोज सकाळी 6 वाजता तेलाच्या किमती जाहीर करतात. सध्या, बेंचमार्क ब्रेंट क्रूड तेल प्रति बॅरल $ 75 वर उपलब्ध आहे. ब्लूमबर्ग एनर्जीच्या मते, ब्रेंट क्रूडची जुलै फ्युचर्स किंमत प्रति बॅरल $ 76.81 आहे. WTI चे जून फ्युचर्स आता प्रति बॅरल $72.68 वर आहे. दरम्यान गेल्या वर्षभरापासून पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. IOC ने जारी केलेल्या दरानुसार, आज दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 89.62 रुपयेवर स्थिर आहे. तर देशातील प्रमुख शहरांमधील नोएडामध्ये पेट्रोलची किंमत 96.79 रुपये प्रति लीटर आहे. डिझेल 89.96 रुपये आहे. फरिदाबादमध्ये पेट्रोलची किंमत 97.49 रुपये आणि डिझेलची किंमत 90.35 रुपये प्रति लीटर आहे. गाझियाबादमध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत 96.50 रुपये आहे, तर डिझेलची किंमत 89.68 रुपये आहे. 


तर मुंबईत (Mumbai Petrol Rate) पेट्रोल 106.31 रुपये, डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर आहे. लखनऊमध्ये पेट्रोल 96.57 रुपये तर डिझेल 89.76  प्रति लिटर दराने उपलब्ध आहे. जयपूरमध्ये पेट्रोलची किंमत प्रति लीटर 108.48 रुपये आणि डिझेलची किंमत 93.72 रुपये आहे. इंदूरमध्ये पेट्रोलची किंमत प्रति लीटर 108.66 रुपये आणि डिझेलची किंमत 93.94 रुपये आहे. पाटण्यात पेट्रोल 107.24 रुपये आणि डिझेल 94.04 रुपये प्रति लिटर आहे. चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये तर डिझेल 94.24 रुपये आहेअहमदाबादमध्ये पेट्रोलची किंमत 96.42 रुपये आणि डिझेलची किंमत 92.17 रुपये प्रति लीटर आहे.


सर्वात स्वस्त पेट्रोल-डिझेल


आजही सर्वात स्वस्त पेट्रोल-डिझेल पोर्ट ब्लेअरमध्ये आहे. येथे पेट्रोल 84.10 रुपये आणि डिझेल 79.74 रुपये प्रति लिटर आहे. तर सर्वात महाग पेट्रोल-डिझेल राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये आहे. येथे एक लिटर पेट्रोलची किंमत 113.48 रुपये आणि डिझेल 98.24 रुपयेला विकले जात आहे.  


एसएमएसद्वारे तपासा आजचे दर 


तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर रोज एसएमएसद्वारे चेक करु शकता.  यासाठी इंडियन ऑइल (IOCL) च्या ग्राहकांना RSP कोड 9224992249 या नंबर पाठवावा लागेल. तुमच्या शहराचा RSP कोड जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.