Petrol-Diesel Price on 7th August 2023: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किमतीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. कच्च्या तेलाच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. आजही कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या आहेत. आंतरराष्ट्रीय बेंचमार्क ब्रेंट क्रूड ऑईल 0.25 डॉलरने वाढून प्रति बॅरल 86.49  डॉलरला विकले जात आहे. त्याच वेळी, डब्ल्यूटीआय क्रूड ऑईल 02.3 डॉलरच्या वाढीसह प्रति बॅरल 83.05  डॉलरला विकले जात आहे. दरम्यान, देशातही तेल कंपन्यांनीही पेट्रोल आणि डिझेलचे (Petrol-Diesel Price) नवे दर जारी केले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी ग्राहकांना कोणताही दिलासा मिळालेला नाही. सोमवारीही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. 7 ऑगस्ट 2023 रोजीही तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती स्थिर ठेवल्या आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत शेवटचा बदल मे 2022 मध्ये झाला होता. तेव्हापासून इंधनाचे दर स्थिर आहेत.


सोमवारी देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लीटर दराने उपलब्ध आहे. चेन्नईमध्ये पेट्रोलची किंमत 102.63 रुपये प्रति लिटर आणि डिझेलची किंमत 94.24 रुपये प्रति लिटर आहे. त्याचवेळी कोलकाता येथे पेट्रोल 106.03 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.


पेट्रोल डिझेलच्या किमती कमी होणार?


दरम्यान, पेट्रोल आणि डिझेलच्या सध्याच्या किमतींमुळे सामान्य माणूस हैराण झाला आहे. मात्र गेल्या वर्षभरापासून या दरांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. मात्र पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी एक महत्त्वाचे विधान केले आहे.  जागतिक ऊर्जा बाजारातील अस्थिरता असूनही, गेल्या 2 वर्षात भारतात पेट्रोलियमच्या किमतींमध्ये कोणतीही लक्षणीय वाढ झालेली नाही. आपले शेजारी देश आणि इतर अनेक मोठे देश असूनही गेल्या 2 वर्षात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत किरकोळ वाढ झाली आहे. केंद्रीय मंत्री पुरी म्हणाले की, आता पूर्वीसारखी स्थिती नाही कारण आता किमती हळूहळू वाढत आहेत ज्यामुळे पूर्वीप्रमाणे सवलत मिळत नाही.