Petrol Diesel Price on 9 September : काही महिन्यांवर लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे महागाईने त्रस्त असलेल्या जनतेला सरकार दिलासा देण्याची तयारी करत असल्याची सातत्याने चर्चा होत आहे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जनतेला दिलासा देण्यासाठी मोठे निर्णय घेतले जात आहेत. अलीकडेच एलपीजीच्या (LPG) दरात अचानक मोठी कपात करण्यात आली. आता जनतेला पेट्रोल आणि डिझेलच्या दरात (Petrol Diesel Price) कपात होण्याची अपेक्षा आहे. दुसरीकडे, देशभरात शनिवारी पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर करण्यात आले आहेत. मात्र राष्ट्रीय पातळीवर इंधनाच्या दरात कोणताही मोठा बदल झालेला नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किंमतीत आज मोठी वाढ दिसून आली आहे. कच्च्या तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमतींनुसार भारतात इंधनाची किंमत ठरवली जाते. आंतरराष्ट्रीय बाजारात आज कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या आहेत. आज आंतरराष्ट्रीय बेंचमार्क ब्रेंट क्रूड 0.81 टक्क्यांच्या वाढीसह प्रति बॅरल 90.65 डॉलरला विकले जात आहे. त्याच वेळी, डब्ल्यूटीआय क्रूडची किंमत प्रति बॅरल 87.51 डॉलर आहे. 


गेल्या वर्षी 22 मे रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल झाला होता. मात्र त्यानंतर अद्याप पेट्रोल डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. देशातील तेल विपणन कंपन्यांनी 9 सप्टेंबरसाठी पेट्रोल आणि डिझेलचे नवीनतम दर जाहीर केले आहेत. 9 सप्टेंबरलाही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.


 पेट्रोल डिझेलचे दर


- दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर
- मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर
- कोलकात्यात पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर
- चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर


दुसरीकडे, पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करण्याबाबत सरकारने कोणतेही संकेत दिलेले नाहीत. पण ब्रोकरेज फर्म जेएम फायनान्शिअलने अंदाज व्यक्त केला आहे की दिवाळीच्या जवळ पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर 3 ते 5 रुपयांची कपात जाहीर केली जाऊ शकते. तसे झाल्यास जनतेला मोठा दिलासा मिळणार आहे. नोव्हेंबर ते डिसेंबर या कालावधीत 5 राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यानंतर पुढील वर्षी लोकसभेच्या निवडणुका आहेत. त्यामुळे निवडणुकीत महागाई हा मोठा मुद्दा बनू शकतो, अशी भीती सरकारला वाटत आहे. सणासुदीच्या काळात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपातीची घोषणा केली जाऊ शकते.