मुंबई : सातत्याने वाढणाऱ्या इंधन दरांचा (Fuel Rate) परिणाम हा इतर गोष्टींवर होत असतो. वाढत्या इंधन दरांमुळे सर्वसामांन्यांचं बजेट कोलमडतं. देशात 21 मे पासून पेट्रोल-डीझेलच्या दरात (Petrol Disel Rate) वाढ झालेली नाही. अनेक महिन्यांपासून तेलाचे (Oil Rate) दरही स्थिर आहेत. मात्र येत्या काळात पेट्रोल-डीझेलच्या दरात वाढ पहायला मिळू शकते. (petrol diesel price petroleum companies demanded hike to petrol disel rate)


इंधनाचे दर का वाढणार? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

झी बिजनेस हिंदीनुसार, पेट्रोलियम कंपन्यांना मे महिन्यापासून तेलाचे दर स्थिर असल्याने कोटींचा तोटा सहन करावा लागतोय. इंडियन ऑईल (Indian Oil Corporation), भारत पेट्रोलियम (Bpcl) आणि हिंदुस्तान पेट्रोलियमला (Hpcl)जुलै-सप्टेंबर या तिमाहीत एकूण 2,749.66 कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागलाय.


देशातील 3 पेट्रोलियम कंपन्यांनी शेअर मार्केटला माहिती दिली. त्यानुसार कंपन्यांच्या झालेल्या नुकसानाला पेट्रोल, डीझेल आणि घरगुती एलपीजी आणि मार्केटिंग मार्जिनमध्ये झालेली घसरण या बाबी कारणीभूत आहे.  


देशात गेल्या 2 वर्षांमध्ये कमी किंमतीत एसपीजी सिलेंडरची विक्री करण्यात आली. यामुळे आर्थिक नुकसान झालं. हे नुकसान भरुन काढण्यासाठी सरकारने एकरकमी 22 हजार कोटी रुपयाचं अनुदान दिले. या अनुदानाच्या रक्कमेमुळे नुकसान कमी झालं. 


पेट्रोल कंपन्यांकडून दरवाढीची सिफारिश


पेट्रोलियम कंपन्यांनी जून 2022 मध्ये पेट्रोल आणि डीझेलच्या दरात वाढ करण्याची मागणी सरकारकडे केली होती. जून महिन्यात कच्च्या तेलाच्या दरात झालेल्या जबरदस्त वाढीमुळे कंपन्यांनी सरकारला पत्राद्ववारे तेलाच्या दरात वाढ करण्याची मागणी केली होती. उल्लेखनीय बाब अशी की गेल्या वर्षीही दिवाशीनंतर तेलांच्या दरात वाढ झाली होती. यामुळे आता गेल्या वर्षाची पुनरावृत्ती पुन्हा होणार का, याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. 


देशातील प्रमुख शहरांमधील पेट्रोल-डीझेलचे दर 


मुंबई - पेट्रोल - 111 रुपये 35 पैसे, डिझेल 97 रुपये 28 पैसे लिटर


दिल्ली - पेट्रोल 96 रुपये 72 पैसे, डिझेल 89 रुपये 62 पैसे लिटर