Petrol Diesel Price: पेट्रोल आणि डिझेलच्या ताज्या किमती जाहीर; जाणून घ्या तुमच्या शहरात काय आहे दर?
Petrol - Diesel Price Today: देशात पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर करण्यात आले आहेत. देशभरात दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलचे दर तेल कंपन्यांकडून अपडेट केले जातात. तर कच्च्या तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमतींनुसार भारतात इंधनाची किंमत ठरवली जाते.
Petrol - Diesel Price Today: 13 फेब्रुवारी 2024 रोजी देशभरात पेट्रोल डिझेलचे दर जाहीर करण्यात आले आहेत. राष्ट्रीय स्तरावर इंधनाच्या दरात किंचित वाढ झाल्याचे दिसून येत आहे. तसेच देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर बऱ्याच दिवसांपासून स्थिर आहेत. तसेच आजही देशाच्या देशांतर्गत बाजारातील तेलाच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. दुसरीकडे आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण होत आहे. याआधी क्रूड आणि ब्रेंटच्या किमतीत घट झाली होती पण क्रूडची किंमत अजूनही 80 डॉलरच्या आसपास आहे. त्यामुळे आज म्हणजेच 13 फेब्रुवारी रोजी देशातील अनेक राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे.
13 फेब्रुवारीसाठी पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर करण्यात आले आहेत. भारत पेट्रोलियम (BPCL), हिंदुस्तान पेट्रोलियम (HPCL) आणि इंडियन ऑइल (IOL) सारख्या देशातील प्रमुख सरकारी तेल कंपन्या इंधन दर जारी करतात, जे आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमतीवर आधारित असतात. दरम्यान, एप्रिल 2022 पासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. शेवटचा बदल 2022 मध्येच करण्यात आला होता. आता सरकारने पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी केल्यास सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर आहे.
मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर आहे.
कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर आहे.
चेन्नईमध्ये पेट्रोल 103.07 रुपये आणि डिझेल 94.66 रुपये प्रति लिटर आहे.
दरम्यान,लोकसभेच्या निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. मात्र आता पर्यंत पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींबाबत सर्वसामान्यांना दिलासा देणारी बातमी समोर आलेली नाही. तर केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करण्याचे कोणतेही संकेत दिले नसले तरी निवडणुकीपूर्वी तेलाच्या किमतीत बदल केला जाऊ शकतो, असेही म्हटलं जात आहे.