Petrol-Diesel Price Today 13th September : गेल्या काही दिवसापासून कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण होत आहे. मात्र सोमवारी सायंकाळी क्रुडच्या (Crude Oil Prices) दरात किंचित वाढ झाली. मात्र, यावेळी क्रूड 7 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आहे. क्रूडच्या किमतीत घसरण होऊनही देशांतर्गत बाजारात तेलाच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. आजही पेट्रोल-डिझेलचे (petrol-diesel) दर जुन्याच पातळीवर कायम आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात कपात


यापूर्वी 22 मे रोजी सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या (petrol-diesel price)  किंमतीवरील उत्पादन शुल्कात कपात केल्यानंतर दरात बदल करण्यात आला होता. त्यावेळी संपूर्ण देशात किमतीत बदल झाला होता. यानंतर महाराष्ट्र (Maharashtra) आणि मेघालयमध्येही तेलाच्या किमतीत बदल झाला आहे. 1 सप्टेंबर रोजी तेल कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या (Gas Cylinder rate) दरात कपात केली.


कच्च्या तेलाच्या किमतीत झालेल्या घसरणीमुळे तेल कंपन्या पेट्रोल (petrol price) आणि एलपीजीच्या (LPG) किमतीची भरपाई करण्याच्या स्थितीत आहेत. मंगळवारी सकाळी WTI क्रूडची किंमत प्रति बॅरल $ 87.87 वर पोहोचली. त्याच वेळी ब्रेंट क्रूड प्रति बॅरल $ 94.08 वर दिसले. 


गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रात शिंदे (Shinde Government) सरकार आल्यानंतर राज्यात पेट्रोलमध्ये 5 रुपये आणि डिझेलवर 3 रुपयांची कपात करण्यात आली होती. मात्र, मेघालयमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दीड रुपयांची वाढ करण्यात आली.


शहर आणि तेलाचे भाव (Petrol-Diesel Price on 13th september)


- मुंबई पेट्रोल 111.35 रुपये आणि डिझेल 97.28 रुपये प्रति लिटर
- दिल्ली पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर
- चेन्नई पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर
- कोलकाता पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर
- नोएडामध्ये पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.96 रुपये प्रति लिटर
- लखनऊमध्ये पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.76 रुपये प्रति लिटर
- जयपूरमध्ये पेट्रोल 108.48 रुपये आणि डिझेल 93.72 रुपये प्रति लिटर
- तिरुअनंतपुरममध्ये पेट्रोल 107.71 रुपये आणि डिझेल 96.52 रुपये प्रति लिटर
- पाटण्यात पेट्रोल 107.24 रुपये आणि डिझेल 94.04 रुपये प्रति लिटर
- गुरुग्राममध्ये 97.18 रुपये आणि डिझेल 90.05 रुपये प्रति लिटर
- बेंगळुरूमध्ये पेट्रोल 101.94 रुपये आणि डिझेल 87.89 रुपये प्रति लिटर
- भुवनेश्वरमध्ये पेट्रोल 103.19 रुपये आणि डिझेल 94.76 रुपये प्रति लिटर
- चंदीगडमध्ये पेट्रोल 96.20 रुपये आणि डिझेल 84.26 रुपये प्रति लिटर
- हैदराबादमध्ये पेट्रोल 109.66 रुपये आणि डिझेल 97.82 रुपये प्रति लिटर
- पोर्ट ब्लेअरमध्ये पेट्रोल 84.10 रुपये आणि डिझेल 79.74 रुपये प्रति लिटर