Petrol Diesel Price : पेट्रोलच्या दरात मोठी वाढ, डिझेलचे भाव स्थिर
दोन महिन्यांत पेट्रोलचे दर 33 टप्यांनी वाढले
मुंबई : गेले दोन दिवस पेट्रोलचे दर स्थिर राहिल्यानंतर आज शुक्रवार 2 जुलै 2021 रोजी इंधनाच्या दरात वाढ झाली आहे. डिझेलच्या किंमतीत कोणताच बदल झालेला नाही. चार प्रमुख शहरात आज पेट्रोलच्या किंमतीत 40 पैसे प्रती लीटरपर्यंत वाढ झाली आहे. (Petrol Diesel Price Today 2 July 2021, No change in Diesel but Petrol Price Hike ) या अगोदर बुधवार, गुरूवारी पेट्रोल डिझेलच्या किंमतीत काहीच बदल झालेली नाही. पेट्रोल-डिझेलच्या दरात चढ-उतार आल्यामुळे सामान्यांच्या खिशाला फटका बसत आहेत.
दिल्लीत आज पेट्रोलचा दर हा 100 रुपये प्रती लीटरपर्यंत पोहोचलं आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचा दरात तेजी पाहायला मिळाली. क्रूड ऑयल बेंचमार्के ब्रेंटचा दर 0.28 रुपयांनी वाढून 75.82 डॉलर प्रति बॅरल पोहोचले आहे. तर WTI क्रूड दराचा भाव 0.25 टक्क्यांनी वाढलं असून 75.15 डॉलर प्रति बॅरल आहे.
दोन महिन्यांत पेट्रोलचे दर 33 टप्यांनी वाढले
5 राज्यांमधील निवडणुका झाल्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढीचा टप्पा 4 मेपासून सुरू झाला. जो आतापर्यंत सुरू आहे. 4 मेपासून आतापर्यंत पेट्रोलच्या दरात एकूण 33 पट वाढ झाली आहे. तर डिझेलच्या किंमतीत 32 पट वाढ करण्यात आली. या वाढीमुळे इंधनाची किंमत आता देशातील बहुतेक पेट्रोल पंपांवर विक्रमी पातळीवर पोहोचली आहे. यासह राजधानी दिल्लीत पेट्रोलच्या किंमतीत आतापर्यंत 8.76 रुपयांनी आणि डिझेलच्या दरात 8.45 रुपयांनी वाढ झाली आहे.
या शहरांमध्ये पेट्रोलची किंमत 100 रुपयांच्या पुढे गेली
4 मेपासून सतत वाढीनंतर आतापर्यंत अनेक शहरांमध्ये पेट्रोलची किंमत 100 रुपये प्रतिलिटरपर्यंत गेली आहे. यात मुंबई, रत्नागिरी, औरंगाबाद, जैसलमेर, गंगानगर, हैदराबाद, लेह, बनसवारा, इंदूर, जयपूर, भोपाळ, ग्वालियर, गुंटूर, काकीनाडा, चिकमगलूर, शिवमोगा, पाटणा आणि लेहचा समावेश आहे.
इंडियन ऑयलने ट्विटरद्वारे म्हटले आहे की, 'आम्हाला ही घोषणा करताना अतिशय आनंद होत आहे, सुमारे 30 हजार इंडियन ऑईल पेट्रोल पंप आता स्वयंचलित झाले आहे. आपल्या जवळच्या पेट्रोल पंपाला भेट द्या आणि ई-पावत्या, ऑटोमॅटिक लॉयल्टी पॉइंट्स आणि ऑटोमॅटिक पेमेन्ट मिळवा. ऑटोमॅटिक म्हणजे इंडियन ऑइल.'
आपल्या शहरातील आजची किंमत जाणून घ्या
पेट्रोल-डिझेलचे दर दररोज बदलतात आणि सकाळी 6 वाजता अपडेट होतात. आपल्याला SMSद्वारे पेट्रोल आणि डिझेलचे दररोजचे दर देखील मिळू शकतात (How to check diesel petrol price daily). इंडियन ऑईलचे ग्राहक RSP लिहून 9224992249 क्रमांकावर आणि बीपीसीएल ग्राहक RSP लिहून 9223112222 या क्रमांकावर माहिती मिळवू शकतात. त्याचवेळी, एचपीसीएल ग्राहक 9222201122 या क्रमांकावर HPPrice पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.