मुंबई : सरकारच्या तेल कंपन्यांनी आज चौथ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती स्थिर ठेवला आहे. देशभरात इंधनाच्या किंमतीचा रेकॉर्ड ब्रेक झाला आहे. अनेक शहरात पेट्रोलचा दर शंभरीपार केला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलांची किंमती वाढल्या आहेत. याचा परिणाम पेट्रोल-डिझेलच्या दरांवर झाला आहे. (Petrol Diesel Price Today 21st July 2021 : Govts excise collections on petrol, diesel jumps 88% to Rs 3.35 lakh crore) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

21 जुलै 2021 रोजी इंडियन ऑइल वेबसाइटनुसार, बुधवारी इंधनांच्या दरात कोणताच बदल झालेला नाही. चौथ्या दिवशी देखील पेट्रोल-डिझेलच्या दरांना ब्रेक लागला आहे. 


पेट्रोल-डिझेलवर टॅक्समधून सरकारला 3.35 लाख करोड रुपयांची कमाई


या आठवड्यात लोकसभेत सरकारने सांगितलं की, पेट्रोल डिझेलमार्फत टॅक्स कलेक्शन 88 टक्क्यांहून अधिक झालं आहे. सरकारला 3.35 लाख करोड रुपये झाले आहे. हा आकडा 31 मार्च 2021 पर्यंतचा आहे. गेल्या एका वर्षात पेट्रोलच्या एक्साइज ड्यूटी 19.98 रुपये प्रतिलीटरने वाढून 32.9 रुपये प्रती लीटरपर्यंत पोहोचले. या अगोदर एप्रिल 2019 ते मार्च 2020 दरम्यान पेट्रोल-डिझेलवरील टॅक्सकडून सरकारला 1.78 लाख करोड रुपये जमा झाले आहेत. 


आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या वाढत्या किंमतीमुळे घरगुती इंधनात आणि पेट्रोल-डिझेलमध्ये वाढ झाली आहे. इंडियन ऑईलने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी इंधनाच्या दरात कोणताच बदल झालेला नाही. आज तिसरा दिवस आहे ज्या दिवशी पेट्रोल-डिझेलचा दर स्थिर आहेत. जुलै महिन्यात आता पेट्रोलच्या दरात एकूण 9 वेळा वाढ झाली आहे. डिझेल पाच वेळा महागलं आणि एक वेळा स्वस्त झालं आहे. याच्या अगोदर जून आणि मे महिन्यात पेट्रोल-डिझेलचे दर जवळपास 16-16 वेळा दरवाढ झाली आहे.


देशात सर्वात महागडं पेट्रोल-डिझेलचे दर या शहरात 


देशात सर्वाधिक महागडं पेट्रोल आणि डिझेल हे राजस्थानच्या गंगानगर आणि मध्य प्रदेशच्या अनुपपूरमध्ये मिळतं. गंगानगरमध्ये पेट्रोलचा दर 113.21 रुपये आणि डिझेलचे दर 103.15 रुपयांवर मिळत आहे. अनुपपूरमध्ये आजचा पेट्रोलचा दर 112.78 रुपये आणि डिझेलचा दर 101.15 रुपये आहे.  


या राज्यात पेट्रोलचा दर शंभरीपार


देशातील 17 राज्‍यात पेट्रोल का भाव 100 रुपये प्रति लीटर किंवा त्याहून अधिक झाले आहेत. राजस्‍थान, मध्‍य प्रदेश, महाराष्‍ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगना, लडाख, जम्‍मू कश्‍मीर, ओडिसा, तमिळनाडु, बिहार, केरळ, पंजाब, सिक्किम, पुड्डुचेरी , दिल्‍ली आणि पश्चिम बंगाल येथे दर वाढले आहे. भोपाळमध्ये 100 रुपये पेट्रोलचा दर आहे.