मुंबई : सरकारी तेल कंपन्यांनी आज पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ केली आहे. आज डिझेलची किंमत 7 पैशांनी वाढली असून पेट्रोलच्या किंमतीत 26 पैशांनी वाढ झाली आहे. देशातील जवळपास नऊ राज्यात पेट्रोलच्या दराने शंभरी गाठली आहे. (Petrol Diesel Price Today : 24th June 2021 Petrol Diesel Rate know your Cities ) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज दिल्लीत पेट्रोलचा दर 97.76 रुपये असून डिझेलचा दर 88.30 रुपये प्रती लीटर आहे. मुंबईत पेट्रोलची किंमत 103.89 रुपये आणि डिझेलची किंमत 95.79 रुपये प्रती लीटर आहे. इंधनच्या दरात एका महिन्यात 30 वेळा वाढ झाली आहे. देशभरात पेट्रोल आणि डिझेलचा दर बुधवारी नवीन उंची गाठली आहे. 


तुमच्या शहरातील इंधनाचा दर जाणून घ्या 



शहर

डिझेल

पेट्रोल

दिल्ली

88.30


 


 

97.76


 


 

मुंबई

95.79


 


 

103.89


 

कोलकाता

91.15


 

97.63


 


 

चेन्नई

92.89


 

98.88


महिन्याभरात 7.1 रुपयाने पेट्रोल तर 7.50 रुपयांनी डिझेल महाग झालं आहे. गेल्या काही दिवसांच्या पेट्रोल डिझेल दरवाढीनंतर आज ब्रेक लागला आहे. ही पेट्रोल वाढ पुढे देखील सुरू राहू शकते असा अंदाज  आहे. सध्या पेट्रोलनं शंभरी पार केली आहे. काही ठिकणी तर पेट्रोल 106 रुपयांपर्यंत पोहोचलं आहे. 


आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे भाव घसले तरी पेट्रोल डिझेलचे आजचे दर मात्र स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पेट्रोल कंपन्यांनी आजचे दर स्थिर ठेवले असून सध्या तरी ग्राहकांना कोणताच दिलासा मिळणार नसल्याचं दिसत आहे. गेल्या काही दिवसांत वाढते पेट्रोल डिझेल आणि त्यामुळे वाढणारी महागाई यामुळे गृहिणींसह सर्वसामान्य नागरिकांचं बजेटही कोलमडलं आहे. 4 मे नंतर 49 दिवसांमध्ये 28 वेळा पेट्रोलच्या किमती वाढल्या.