Petrol-Diesel Price Today : पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी वाढ, आजचा दर
इंधन दरवाढीचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर
मुंबई : Petrol and Diesel Price Today 29 May 2021 आज पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी जाहीर केलेल्या दरात बदल पाहयला मिळत आहे. मुंबईत पेट्रोलने शंभरी गाठली असून आजचा दर हा 100.23 रुपये आहे. (Petrol Diesel Price Today 29 May 2021 : Latest Price Maharashtra Mumbai Fuel Rates ) तर डिझेलचा दर हा 92.21 रुपये झाला आहे. त्याचप्रमाणे स्पीड पेट्रोल दर 103.14 रुपये झाला आहे.
कोलकातामध्ये पेट्रोलचा दर 93.72 रुपये आणि डिझेल 87.46 रुपये प्रती लीटर आहे. तसेच चेन्नईत पेट्रोल 95.28 रुपये आणि डिझेल 89.39 रुपये दर आहे.
गुरूवारी पेट्रोलच्या दरात 24 पैसे प्रती लीटर आणि डिझेल 29 पैसे प्रती लीटरचे महागलं आहे. महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात पेट्रोलने शंभरी गाठली आहे. तर दिल्लीत पेट्रोलचा दर 93.68 रुपये प्रती लीटर आणि डिझेलची किंमत 84.61 रुपये प्रती लीटर आहे.
ल्या काही दिवसांपासून इंधनाच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. देशभरातील विविध शहरांमधील काल पेट्रोलची किंमत 18 ते 25 पैसे प्रतिलीटर तर डिझेलच्या किंमतीत 28 ते 32 पैसे प्रतिलीटरने वाढ झाली होती. आज मात्र हे दर स्थिर असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र महाराष्ट्रातील बहुतांश शहरात पेट्रोलने शंभरी गाठली आहे. तर डिझेलच्या दराने नव्वदी पार केली आहे.
दररोज सकाळी 6 च्या दरम्यान तेल कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जारी केले जातात. Goods Return या वेबसाईटने आज पेट्रोल-डिझेलचे दर जारी केले आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींचा परिणाम आवश्यक गोष्टींवर होतो. त्यामुळे सर्वसामान्यांचे लक्ष दररोज बदलणाऱ्या पेट्रोल डिझेलच्या किंमतीवर असते.